महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उच्च न्यायालयाचा निर्णय; दुहेरी खुनातील कैद्याला 28 दिवसांचा फर्लो मंजूर - 28 days leave to prisoner in double murder case

Mumbai High Court : नाशिक येथे 2013 च्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या रहीम मुनावर पठाण याने 28 दिवसांच्या फर्लोसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडं अर्ज केला होता. न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठानं हा फर्लो मंजूर केला आहे. 23 डिसेंबरला न्यायालयानं याबाबतचे आदेश पत्र जारी केले.

mumbai high court grants 28 days leave to prisoner in double murder case
उच्च न्यायालयाचा निर्णय; दुहेरी खुनातील कैद्याला 28 दिवसांचा फर्लो मंजूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 2:42 PM IST

मुंबई Mumbai High Court :शिर्डी येथे राहणाऱ्या रहीम मुनावर पठाण याच्यावर दुहेरी हत्याकांडाचा आरोप असून कलम 302 नुसार नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. अकरा वर्षांपासून तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. यापूर्वी त्यानं पोलीस महासंचालकांकडं फर्लो रजेसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यानं पोलीस महासंचालकांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयानं त्यांचा अर्ज मंजूर केला आहे.



पोलीस महासंचालकांनी फेटाळला अर्ज :रहीम मुनावर पठाण या आरोपीनं 6 सप्टेंबर 2021 रोजी नाशिक जिल्हा तुरुंग अधीक्षकांकडे फर्लो रजेसाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आल्यानंतर त्यानं पोलीस महासंचालकांकडं अर्ज केला. मात्र, यावेळेसही त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यानं पोलीस महासंचालकांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर दाखल केली. न्यायालयानं त्याचा 28 दिवसांचा फर्लो मंजूर करत तुरुंग अधीक्षक आणि पोलीस महासंचालकांचा निर्णय रद्द केलाय.



राज्य पोलीस महासंचालकांचा निर्णय रद्द : या संदर्भात उच्च न्यायालयात बाजू लढवणारे वकील नितीन सातपुते म्हणाले की, "दुहेरी खुनामध्ये रहीम मुनावर पठाण याला जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यानं तुरुंग प्रशासन आणि राज्य पोलीस महासंचालकांकडे रजेचा अर्ज केला होता. पण त्यांनी तो फेटाळला म्हणून उच्च न्यायालयात त्याला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयानं फर्लो मंजूर करण्याचा निर्णय घेतलाय."

ABOUT THE AUTHOR

...view details