मुंबई - जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एका अभियंत्याला मारहाण झाली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे हस्तांरीत का केली जात नाही? अशी विचारणा या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
आव्हाडांच्या निवासस्थानी अभियंत्याला मारहाणप्रकरणी उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस - उच्च न्यायालय नोटीस
गेल्या ७ एप्रिलला जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एका अभियंत्याला मारहाण झाल्याची तक्रार संबंधित अभियंत्याने नोंदवली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता उच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
![आव्हाडांच्या निवासस्थानी अभियंत्याला मारहाणप्रकरणी उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस engineer beaten on jitendra awhad bunglow आव्हाडांच्या बंगल्यावर अभियंता मारहाण अभियंता मारहाण प्रकरण उच्च न्यायालय नोटीस mumbai high court notice](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6910917-thumbnail-3x2-awha.jpg)
गेल्या ७ एप्रिलला जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून त्यांच्या संरक्षणात असलेल्या सरकारी पोलिसांनी मला उचलून आणले. यानंतर आव्हाड यांच्या विवियाना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली. तेदेखील आव्हाड यांच्यासमोर आणि आव्हाड यांनीच मला पोस्ट डिलीट करायला लावली, अशी तक्रार ठाण्यातील एका तरुण अभियंत्याने दिली होती. त्यानंतर या प्रकरणात भाजपच्या काही नेत्यांनी उडी घेतली. तसेच आव्हाड यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यासंबंधी राज्य सरकारला विचारणा केली आहे.