मुंबई:जानेवारी महिन्याच्या शेवटी अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे (JEE Main exam) ढकलण्यात यावी, आणि 75 टक्के गुणांच्या पात्रतेचा निकष शिथिल करावेत, अशी मागणी करणारी (High Court) जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. (Mumbai High Court) या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान याचिकाकर्ता यांना कोणत्या नियमाच्या आधारे याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती याचिकेसोबत जोडली नसल्याने न्यायालयाने याचिकाकर्ता फटकारले आहे. कोणत्या नियमावली आधारे याचिका दाखल केली. या संदर्भातील माहिती देण्याकरिता याचिकाकर्ता वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी 10 जानेवारीपर्यंत तहकुब केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जेईई मेन 2023 सत्र 1 पुढे ढकलण्याच्या याचिकेवर स्थगिती दिली आहे. याचिकाकर्ता परीक्षेचं माहितीपत्रक सादर करू शकला नाही. त्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहे. तुम्ही ज्या नियमांना आव्हान देत आहात ते तुम्ही दाखल केलेले नाहीत? तुम्ही ज्या नियमांना आव्हान देत आहात त्या नियमांशिवाय तुम्ही याचिका कशी दाखल करू शकता? हे कसे अन्यायकारक आहे, ते आम्हाला तपासावे लागेल अशी टिप्पणी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांच्या खंडपीठाने केली आहे.
24 ते 31 जानेवारीदरम्यान होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासह आयआयटीमध्ये प्रवेशास पत्र होण्यासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करावा अशी मागणी वकील अँड. अनुभा श्रीवास्तव सहाय जनहित याचिकेतून केली आहे. तसेच जेईई मुख्य परीक्षा घेण्याबाबत आणि परीक्षेच्या पात्रता निकषाबाबत केंद्रीय परीक्षा संस्थेने 15 डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेलाही याचिकेला आव्हान दिले आहे.