मुंबई - निवडणुकीदरम्यान शहरात बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्या विरोधात सुस्वराज्य फाऊंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी देत म्हणाले, शहरात बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्या उमेदवारांची थेट उमेदवारीच रद्द झाल्यास समाजात योग्य तो संदेश जाईल, असे विधान सोमवारी केले.
बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यांची उमेदवारीच रद्द झाल्यास समाजात योग्य संदेश जाईल - उच्च न्यायालय - election
बेकायदा होर्डिंग लावणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात राजकीय पक्षांकडून स्वतःहून कारवाई झाल्यास त्याचे स्वागत होईल.
या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. न्यायालयाने असेही म्हटले आहे, की बेकायदा होर्डिंग लावणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात राजकीय पक्षांकडून स्वतःहून कारवाई झाल्यास त्याचे स्वागत होईल.
भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बेकायदा बॅनरविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱयांना मारहाण केली होती. या मारहाणी विरोधात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने मुरजी पटेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने धारेवर धरले. घडलेल्या प्रकरणाची माफी मागा आणि पालिका अधिकाऱयांना केलेल्या मारहाणीबद्दल पालिकेला नुकसानभरपाई देऊन हे प्रकरण मिटवा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावेळी नुकसानभरपाई देण्याचे मुरजी पटेल यांनी मान्य केले.