महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Santosh Parab Attack : मुंबई उच्च न्यायालकडून नितेश राणे यांना दिलासा कायम; गुरुवारी पुन्हा सुनावणी - नितेश राणे मुंबई उच्च न्यायालय सुनावणी

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर अखेर नितेश राणे यांनी ( Sindhudurg session court rejected Rane bail ) 3 जानेवारी जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर आज सुनावणी झाली. ( Santosh Parab Attack Case Update )

nitesh rane
नितेश राणे

By

Published : Jan 12, 2022, 3:50 PM IST

Updated : Jan 12, 2022, 4:34 PM IST

मुंबई -भाजप आमदार नितेश राणे ( Bjp Mla Nitesh Rane ) यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून ( Mumbai High Court ) पुन्हा दिलासा मिळाला आहे. आता संतोष हल्ला प्रकरणी ( Santosh Parab Attack ) गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सध्या दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत सुरू आहे. तीन वाजता न्यायालयाची वेळ संपल्याने आजचे कामकाज थांबवण्यात आलं. नितेश राणेंच्या वकिलांकडून त्यांची बाजू आज मांडण्यात आली. यानंतर आता उद्या दुपारी एक वाजता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. या अटकपूर्व जामिनावर जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय आपला निकाल देत नाही तोपर्यंत नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कुठलीही कठोर कारवाई होणार नाही, अशी ग्वाही राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

आजच्या सुनावणीत नितेश राणे यांच्या वकिलांकडून अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तीवाद पूर्ण करण्यात आला. यावेळी त्यांनी हे प्रकरण निव्वळ राजकीय वैमन्यस्यातून उकरुन काढत नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. विधानभवनातील म्याव म्याव प्रकरणानंतर जुन्या प्रकरणावरुन त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केल्याचे यावेळी राणेंच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं.

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर अखेर नितेश राणे यांनी ( Sindhudurg session court rejected Rane bail ) 3 जानेवारी जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात शुक्रवारी 7 जानेवारीला नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. या सुनावणीत नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. ( Nitesh Rane not relieved by Mumbai High Court ) नाही. यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी झाली असून आजचे कामकाज तहकूब झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा कायम मिळाला आहे. नितेश राणे यांचे वकिलांकडून आज युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी आता उद्या गुरुवारी पुन्हा एक वाजता सुनावणी होणार आहे.

हेही वाचा -FIR Against Kalicharan Maharaj : कालीचरण महाराज वर्धा पोलिसांच्या ताब्यात; दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी

सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध शिवसेना -

कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला ( Shivsena Vs Rane in Kokan ) मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत हा संघर्ष पाहायला मिळाला आहे. राणे विरुद्ध शिवसेना असा सामना या निवडणुकीमध्ये रंगला होता. मात्र, या निवडणुकीत अखेर राणे यांना मोठे यश मिळाले आहे. 11 जागा राणे गटाच्या निवडून आल्या आहे. तसेच शिवसेनेच्या ताब्यात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक नारायण राणे यांच्या गटाकडे आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा कोकणामध्ये नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.

Last Updated : Jan 12, 2022, 4:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details