मुंबई:ज्येष्ठ विधीज्ञ मुंदर्गी तसेच आबाद फोंडा यांनी संजय राऊत यांच्या वतीने बाजू मांडली तर अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल सी सिंग यांनी बाजू मांडली. संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केला आहे, या प्रकारचा आरोप ठेवून त्यांना अटक केली होती. अनेक महिने ते तुरुंगामध्ये होते; मात्र त्यांच्या वतीने वकिलांनी बाजू मांडल्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी संजय राऊत यांचा गुणवत्तेच्या आधारे जामिनाचा अर्ज मान्य करत त्यांना जामीन दिला होता.
जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर: या जामिनानंतरच संजय राऊत मुंबईच्या भायखळा येथील तुरुंगातून बाहेर आले; मात्र त्यांना जामीन मिळताच काही दिवसानंतरच अंमलबजावणी संचलनालयाने ज्येष्ठ अधिवक्ता अनिल सिंग यांच्या वतीने या अर्जाला आव्हान दिले गेले; परंतु या याचिकेची उच्च न्यायालयामध्ये सुनावणी अद्यापही नियमित पद्धतीने सुरू झालेली नाही.
न्यायाधीशांनी दिले 'हे' कारण: आज झालेल्या सुनावणीच्या वेळी अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता अनिल सिंग यांनी सांगितले की, जामीन अर्जाला आम्ही आव्हान दिलेले आहे. यावर सुनावणी कधी होणार? असे विचारल्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी सांगितले की, न्यायालयात मोठा खटल्यांचा ढीग पडलेला आहे. न्यायालयीन कामकाजामुळे ही सुनावणी येथे तहकूब करीत पुढील सुनावणी 15 जून रोजी होईल.