महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai HC On Posco Case: पीडितेचे वय 18 पेक्षा कमी असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे 'पोस्को' प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता - आरोपीवरील पोस्कोचा गुन्हा रद्द

उत्तर प्रदेश मधील मूळचा राहणारा माहेरबान हसन बाबू खान याने पीडित मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली होती. उपलब्ध पुराव्याच्या आधारे आणि वैद्यकीय अहवालाआधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी पीडिता ही 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याचे पुराव्याच्या आधारे सिद्ध होत नसल्यामुळे आरोपीला निर्दोष मुक्त केले. तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा देखील रद्द केला.

Mumbai HC On Posco Case
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई

By

Published : May 8, 2023, 8:55 PM IST

मुंबई:तक्रारदार पीडित महिलेच्या सांगण्यानुसार 2015 ते 2016 दरम्यान आरोपीने तिच्याशी शरीर संबंध केला आणि 25 मार्च 2016 ला ती गरोदर असल्याचे तिला लक्षात आले. परंतु आरोपी उत्तर प्रदेशला त्याच्या गावी पळून गेला आणि मग आपल्या या पोटातल्या होणाऱ्या बाळाचे पालकत्व कोण स्वीकारणार म्हणून तिने पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने उत्तर प्रदेशला जाण्याच्या आधी तिला सांगितले की, तो त्याच्या मूळ गावी जातो आहे आणि परत रायगड जिल्ह्यामध्ये येणार आहे. तोपर्यंत वाट पहा. मात्र तो वेळेत न आल्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली.



तिने दिला बाळाला जन्म: आपल्याला लग्न करण्याचे कबूल केले आणि परत येतो, असे सांगून पळून गेला आणि या बहाण्याने त्याने शरीर संबंध केले. आता तो येत नाही, हे तिला वाटल्यामुळे तिने रायगड या राहत्या ठिकाणी पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्याच्या नावावर फौजदारी तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिसांनी तपासाच्या अंतिम त्याला शोधून अटक केली. परंतु अटक करेपर्यंत त्या पीडित मुलीला बाळ झाले आणि तिने एका मुलीला जन्म दिला.


काय म्हणाला आरोपी? त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने त्याच्या बचावामध्ये न्यायालयामध्ये आपल्या वकिलामार्फत बाजू मांडली. त्याच्या म्हणण्यानुसार, तो उत्तर प्रदेश मध्ये गेला. तो इकडे येणाराच होता; परंतु त्याला जरा उशीर झाला. मात्र इकडे आल्या-आल्या पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र मी तर लग्न करायला तयार आहे. मी त्या झालेल्या मुलीचे पालकत्व देखील स्वीकाराला तयार आहे. त्याच्यामुळे यावर काही प्रश्नच नाही आणि आमचा सहमतीने शरीर संबंध झाला होता.


यामुळे खंडपीठाचा एकल निर्णय: पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्यावर 'पोस्को' अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला होता. वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाने पीडित मुलीच्या वयाची खात्री करण्यासाठी तपासणी केली असता वय 18 पेक्षा कमी असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे सबब त्याच्यावर 'पोस्को' या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवता येत नाही असे देखील न्यायालयाने सांगितले. मुलीचे आणि त्याचे सहमतीने शरीर संबंध होते. त्याच्यामुळे त्याच्यावर दाखल गुन्हा रद्द करत त्याला निर्दोष मुक्त बहाल केल्या जात आहे, असा न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्या एकल खंडपीठाने निर्णय दिला.


अक्कलदाढेच्या आधारे वयाचा शोध?दंतवैद्याने पीडितेचे वय 15 ते 17 असे असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले होते. त्यात त्याने अक्कलदाढ येणे आणि न येणे या आधारावर मत व्यक्त केले होते.परंतु, त्याने तीन दात ऐवजी केवळ दोनच दात पाहिले असल्याचे म्हटले. तिसरा दात त्याने पाहिला नव्हता. त्यामुळे त्याला ते लक्षात आले नाही. त्यामुळे त्याने ती 18 वयापेक्षा कमी असल्याचा वैद्यकीय अहवाल दिला होता. मात्र, न्यायमूर्तींसमोर दंतवैद्याने ही बाब स्पष्ट केली. हे देखील कबूल केले की, 18 वयानंतर अक्कलदाढ ही येऊ शकते. तसेच रेडिओग्राफीच्या आधारे तपासणी केली असता पीडितेचे वय 18 पेक्षा कमी असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.


अखेर आरोपीची निर्दोष मुक्तता: न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी आपल्या निकाल पत्रामध्ये नमूद केले की, पीडित मुलीचे 18 पेक्षा वय कमी आहे, असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नसल्यामुळे अखेर 'पोस्को' हा गुन्हा देखील रद्द करावा लागत आहे. आणि त्यांचे सहमतीने शरीर संबंध असल्यामुळे कलम 375 अनुसार त्याच्यावरील दाखल 'एफआयआर' देखील रद्द करत त्याला निर्दोष मुक्त केले जात आहे.

हेही वाचा-

Mocha Cyclone: मोचा चक्रीवादळ! बांगलादेशासह म्यानमारच्या किनारपट्टीवर दाखल; ईटीव्हीचा खास रिपोर्ट

Karnataka Election Campaign: कर्नाटकातील निवडणूक प्रचार थंडावला; मराठी मुलुखात नेत्यांना मज्जाव

Sharad Pawar U Turn : राजकारणात वारंवार यू-टर्न घेतल्यानेच पवारांना यशाची हुलकावणी? जाणून घ्या सविस्तरपणे

ABOUT THE AUTHOR

...view details