मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे ( Corona New Varient omicron ) संकट घोंगावत असताना मुंबईतील आरोग्य क्षेत्राबाबत प्रजा फाऊंडेशनने सादर केलेल्या अहवालातुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाशी लढा सुरु असताना गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात ४५ टक्के वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ( Mumbai Health Worker ) पदे भरण्यात आली नाही. तसेच, आता १९९ दवाखाने उपलब्ध आहेत. त्यातील १८७ दवाखान्यांपैकी केवळ १५ दवाखानेच १४ तास सुरु असून, बाकीचे ५ ते ८ असतात, असेही या अहवालात म्हटलं आहे.
यासंदर्भात मुंबई फर्स्ट (Mumbai First Organisation ) आणि प्रजा फाऊंडेशन ( Praja Foundation In Mumbai ) यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत मुंबईतील आरोग्य क्षेत्राबाबत हा अहवाल सादर केला. त्यामध्ये सांगिल्यानुसार, २०२० पर्यंत वैद्यकीय आणि पॅरा - वैद्यकीय कर्मचा-यांची अनुक्रमे ४४ टक्के व ४५ टक्के पदे रिक्त आहे. कोरोना महामारीच्या ( National Corona Pandemic ) आपात्कालीन काळात आरोग्य व्यवस्था सक्षमपणे लढण्यासाठी ही रिक्त पदे भरण्यात यावी, असेही यात सुचवले आहे. राष्ट्रीय इमारत बांधकाम संहितेतील संहितेतील मानकांनुसार दर १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना आवश्यक असताना फक्त १९९ दवाखाने आहेत. यामधील १८७ दवाखान्यांपैकी १५ दवाखाने १४ तास, तर अन्य दवाखाने अत्यंत कमी वेळ सुरु असतात. यामुळे कोरोना काळात सरकारी दवाखान्याची आवश्यकता असल्याचेही या अहवालात नमूद केलं आहे.