मुंबईMumbai HC Order To Bata:2007 मध्ये आठवड्याचे कामाचे तास वाढवण्याचा कंपनीने (Bata Company) निर्णय घेतला आणि आठवड्याचे सातही दिवस शोरूम चालवण्याचा देखील निर्णय झाला. मात्र, रोटेट रोटेशन पद्धतीने आठवडी सुट्टी पद्धतीला कामगारांनी विरोध केल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. (Mumbai High Court Relief to Salesman)
साप्ताहिक सुटी रोटेशन पद्धतीने अमान्य:बाटा इंडिया लिमिटेड या कंपनीने 2007 मध्ये काही दुकान उघडणे आणि बंद करण्यासंदर्भात नवीन नियम सुरू केले. मुंबई, ठाणे, पुणे या महाराष्ट्रातील मोठ्या शहरात सातही दिवस शोरूम सुरू ठेवण्याचा निर्णय करण्यात आला. हे शोरूम रात्री साडेनऊ वाजेपर्यंत बंद ठेवता येईल. परंतु साप्ताहिक सुट्टी एकाच दिवशी सर्वांनी न घेता रोटेशन पद्धतीने एकेकाला आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी देण्याचा निर्णय कंपनीने केला. मात्र कंपनीचा निर्णय कामगारांना मान्य नव्हता.
रोस्टरचे पालन न केल्यामुळे कंपनीने काढले:बाटा कंपनीने या कर्मचाऱ्यांना रोस्टरचे पालन न केल्यामुळे त्यांना काढून टाकले. मात्र औद्योगिक विभाग न्यायालयाने त्यांना कामगार असल्याचे मान्य करत 50 टक्के वेतन देऊन पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश दिले. औद्योगिक विभाग न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यावर मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेत 100% वेतन मिळण्यासाठी मागणी केली आणि औद्योगिक विवाद कायदा 1947 नुसार सेल्समन हा कामगार आहे. त्यामुळे त्याला त्याचे हक्क मिळाले पाहिजे, असा दावा वकिलांनी उच्च न्यायालयासमोर मांडला.