मुंबईBhopal Gas Tragedy:भोपाळ गॅस दुर्घटना ही युनियन कार्बाईड कंपनीमुळे झाली होती. या अमेरिकन कंपनीच्या चुकीमुळे हजारो लोकं कायमचे अपघातग्रस्त झाले. तर हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यावर आधारित 'रेल्वे मेंन अनस्टोल्ड टोरी ऑफ भोपाल 1984' या वेब सिरीजला स्थगिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात युनियन कार्बाईड कंपनीच्या दोषी ठरलेल्या व्यक्तींनी आव्हान दिले होते; मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. यशराज फिल्मच्या या वेबसिरीजला आता उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिलेला आहे. न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांनी हा निर्वाळा दिला. 17 नोव्हेंबर रोजी हे आदेश न्यायालयाने दिले. (Mumbai High Court)
युनियन कार्बाईड कर्मचाऱ्यांचा दावा फेटाळला; भोपाळ गॅस कांडावर वेब सिरीजला उच्च न्यायालयाचा ग्रीन सिग्नल
Bhopal Gas Tragedy: भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित वेब सिरीजला स्थगिती द्यावी, (Bhopal Gas Tragedy Web Series) यासाठी मुंबई उच्च न्यायालयात युनियन कार्बाईड कंपनीच्या दोषी ठरलेल्या व्यक्तींनी आव्हान दिले होते; (Web Series on Bhopal Gas Tragedy) मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत या स्थगितीस नकार दिला आहे. न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांनी हा निर्वाळा दिला. (Union Carbide Company)
Published : Nov 17, 2023, 10:58 PM IST
कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे दुर्घटना:जगाला हादरवून सोडणारी आणि भारताच्या इतिहासात कायम जखम म्हणून भळभळती वाहणारी घटना होय. ती म्हणजे 2 डिसेंबर 1984 भोपाळ या ठिकाणी अमेरिकेच्या युनियन कार्बाईड कंपनीतून घातक रसायन मिथाईल आयसोनाईट वायूमुळे साडेतीन हजार पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आणि किमान 15000 लोक आजार होऊन नंतर मरण पावले. याबाबत स्वतंत्र चौकशी भारत सरकारने केली होती. त्यातून या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याचा ठपका त्यावेळेला ठेवण्यात आला होता; मात्र खटला शहर दिवाणी न्यायालयात प्रलंबित होता. कारण कोर्टात जाण्यास कर्मचाऱ्यांना उशीर झाला होता.
काय आहे कर्मचाऱ्यांचं म्हणणं?या कंपनीचे त्या वेळेला तत्कालीन उत्पादन व्यवस्थापक म्हणून सत्यप्रकाश चौधरी आणि मुकुंद जे हे त्या कीटकनाशक कारखान्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांचं म्हणणं होतं की, आमच्यावर एकूण भोपाळ दुर्घटनेबाबत जो आरोप ठेवलेला आहे त्याबाबत नियमक नियंत्रणेच्या अनुपस्थित त्यांना दोषी ठरवलं गेलं. त्याबाबत अपील प्रलंबित आहे आणि दरम्यान वेब सिरीजमुळे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. याबाबत शहर दिवाणी न्यायालयाने याचिकाकर्त्या युनियन कार्बाईड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सवलत नाकारली होती. त्या शहर दिवाणी न्यायालयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली होती.
वेब सिरीजला रोखण्याचा हक्क नाही:उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांनी या वेब सिरीजला स्थगिती देण्यास नकार दिला आणि आपल्या आदेशपत्रात नमूद केले की, जगाला आणि देशाला हादरवून टाकणारी भोपाळ गॅस कांडाची घटना अत्यंत दुर्दैवी होती. त्या घटनेवर अनेक माहितीपट, पुस्तके, लेख, चित्रपट, व्हिडिओ डॉक्युमेंटरी तयार केली गेलेली आहेत. त्या आधारावर वेब सिरीज तयार केली गेली आहे. त्याच्यामुळे आधीपासूनच याबाबत सार्वजनिक डोमेनमध्ये अनेक साहित्य प्रकाशित होते. त्यामुळेच याचिकाकर्त्यांना या वेब सिरीजला मनाई करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे यशराज फिल्म यांना आता वेब सिरीज प्रसारित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
हेही वाचा: