महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

RBI Digital Currency : आरबीआयकडून देशात सर्वप्रथम मुंबईच्या फळ विक्रेत्याला डिजिटल करन्सीचा परवाना - Digital currency another big scam

आरबीआयकडून घोषणा केल्यानुसार प्रत्यक्षात मुंबईत डिजिटल करन्सीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी भारतातील पहिल्या व्यक्तीची निवड झालेली आहे. मुंबईतील बच्चेलाल सहानी जो फळ विक्रेता आहे त्याची निवड करण्यात आली आहे. त्याला सर्वप्रथम ही डिजिटल करन्सी वापरण्याचा परवाना दिला.

RBI digital currency
आरबीआय

By

Published : Jan 15, 2023, 1:59 PM IST

फळ विक्रेत्याला डिजिटल करन्सीचा वापर परवाना

मुंबई :आरबीआयने ऑक्टोबर 2022 मध्ये आरबीय संदर्भात घोषणा केली होती. त्याचा वापर करण्यासाठी प्रायोगिक स्वरूपात डिजिटल करन्सी म्हणून ई रुपी नावाचे चलन बाजारात आणणार होते. आता ते प्रत्यक्ष आरबीआयने व्यवहारांमध्ये उतरवलेले आहे. जनतेमध्ये क्रेज होण्यापूर्वी चाचणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर आरबीआयसमोर असलेल्या बच्चेलाल सहानी या फळ विक्रेता दुकानदाराला सर्वप्रथम या डिजिटल करन्सीचा वापर करण्याचा परवाना दिला.


डिजिटल रुपी पेमेंटचे माध्यम : आरबीआयने जारी केलेल्या माहितीनुसार डिजिटल रुपी हे पेमेंटचे माध्यम आहे. जे भारतातील सर्व नागरिक नोकरदार व्यवसायिक या सगळ्यांसाठी ते वापरता येईल. आणि त्यासाठी कायदेशीर निविदा आरबीआयच्यावतीने जारी केली जाईल. आणि याची किंमत ही लीगल टेंडर नोट यांच्या समकक्ष असेल. देशांमध्ये आरबीआयकडून डिजिटल करन्सी आल्यानंतर जनतेला पैशात व्यवहार करण्याची गरज भासणार नाही. असा शासनाचा दावा आहे. अर्थात नोटबंदी वेळीदेखील असा दावा करण्यात आला होता.


युटीएस ॲप :युटीएस ॲप रेल्वे प्रवासी वापरतात. त्यामध्ये एक सोय आहे. ज्याला आर वॉलेट असे नाव आहे. त्यामध्ये आपण आपल्या बँकेच्या बचत खात्यामधून यूटीएस ॲपमधील आर वॉलेटमध्ये काही एक रक्कम ठेवू शकतो. तिच्यामुळे आपल्याला 5 ते 10 किंवा 100 रुपये कितीही रुपयाचे तिकीट खरेदी करायचे असेल तर आपण त्यातून ते खरेदी करू शकतो. देशभरामध्ये हे सर्व जनतेने वापरण्याआधी प्रायोगिक स्वरूपात मुंबईतील आरबीआयच्या मुख्यालयाच्या खेटून असलेल्या एका फळविक्रेताला याचा आधी परवाना दिला. 1992 पासून ते मुंबईमध्ये आहेत. मूळचे बिहार येथील आहे आणि गेले 27 वर्ष आरबीआयच्या गेट समोर ते फळ विक्रीचा व्यवसाय करतात. जनतेला ई डिजिटल करन्सी वापरायला सोपी होण्यासाठी त्यांनी माझी निवड केली. मी या ई डिजिटल करन्सीद्वारे आता व्यवहार करीत आहे. हे सोपं आहे. त्यामुळे जनतेने देखील याचा वापर करावा." असे त्यांनी सांगितले.



डिजिटल करन्सीचा ॲपमधून वापर : आरबीआयची ई डिजिटल करन्सी ही ॲपमधून आपल्याला वापरता येणार आहे. जिथे आपण गुगल पे किंवा फोन पे किंवा इतर खाजगी एप्लीकेशन द्वारे आपण जो व्यवहार करतो तो आता सरकारी आरबीआयच्या द्वारे डिजिटल ई करन्सीद्वारे तो व्यवहार करता येणार आहे. यामुळे सरकारला विविध पातळीवर महसूलही मिळेल. तसेच व्यवहार करणाऱ्या कोणत्याही नागरिकांवर नजर देखील ठेवता येईल, असे केंद्र सरकारला वाटते.



ई-डिजिटल चलन दुसरा मोठा घोटाळा : अर्थ विषयाचे जाणकार अभ्यासक विश्वास उटगी अर्थशास्त्र आणि डिजिटल करन्सीबाबत विश्लेषण करताना म्हणाले,'डिजिटल करन्सीबाबत खरे तर यातील जाणकार आणि कामगार चळवळीने तर प्रखरपणे प्रहार केला पाहिजे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली होती आता त्याची अमलबजावणी सुरु आहे. हा नोटबंदीसारखा दुसरा मोठा घोटाळा आहे. महाघोटाळ्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. हे जनतेने समजून घेतले पाहिजे. ८ नोव्हेम्बर २०१६ मध्ये १७ लाख कोटी रोकड रक्कम होती. ती आता ३२ लाख कोटी रोकड कशी झाली? एवढी रक्कम केंद्र सरकारने का छापली. सरकारने तर नोटा कमी करायच्या होत्या. पेटीएम सार्वत्रिक करणार होते ना. त्याच काय झाले? ते केंद्र शासनाने बोलावे. यावर आरबीआय बोलत का नाही?

हेही वाचा :Aurangabad Crime सहायक पोलीस आयुक्तांनी मित्राच्या पत्नीची काढली छेड, तक्रारीनंतर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details