महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परप्रांतीय मासे विक्रेत्यांबाबत कोळी महिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट

परप्रांतींयाविरोधात कारवाई करण्यासाठी मनसे नेहमी पुढाकार घेते. याची कल्पना असल्याने काही कोळी महिलांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतली व परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कारवाई करण्याची केली मागणी

Raj Thackeray
राज ठाकरे

By

Published : Oct 5, 2020, 1:50 PM IST

मुंबई -वाडीबंदर मासळी बाजाराबाहेर बसणाऱ्या अनधिकृत परप्रांतीय मासेविक्रेत्यांमुळे कोळी महिलांचा व्यवसाय मंदावाला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी कोळी महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे घर गाठले. मुंबईच्या डोंगरीवाडी बंदरहून आलेल्या कोळी महिलांनी आज कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर राज यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली. राज यांनी या कोळी महिलांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

कोळी महिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट

वाडी बंदर रोडला परप्रांतीय मासे विक्रीचा व्यवसाय करतायत. ते रस्त्यातच बसत असल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीही होते. तसेच ते कोरोनाच्या नियमांचे पालन देखील करत नसल्याचे कोळी महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळेवाडीतील मच्छी मार्केट परिसरात अनधिकृत मासेविक्री करणाऱ्यांना परप्रांतीयांना हटवण्यात यावे, अशी मागणी कोळी महिलांनी राज ठाकरेंकडे केली.

उरण, गोराई, वेसावा, खारदांडा, कुलाबा, वरळी, शिवडी, माहिम, सायन याठिकाणचे स्थानिक कोळी पहाटे उठून उदरनिर्वाह करण्यासाठी वाडी बंदरात येतात. मात्र, परप्रांतीय अगदी स्वस्तात मासे विकत असल्याने आमच्याकडे ग्राहक फिरकत नसल्याचे कोळी महिलांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details