महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत 24 मजली इमारतीला आग; 135 नागरिकांची केली सुटका - मुंबई महापालिका

Fire Breaks Out in Mumbai : मुंबईतील 24 मजली इमारतीला गुरुवारी पहाटे 3.40 वाजता आग लागली. या आगीतून 135 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. अद्यापही घटनास्थळावर कुलींगचं काम सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिका अधिकाऱ्यानं दिली.

Fire Breaks Out in Mumbai
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 10:40 AM IST

Updated : Nov 23, 2023, 11:22 AM IST

मुंबई Fire Breaks Out in Mumbai : शहरातील 24 मजली इमारतीला आग लागल्यानं अडकलेल्या 135 नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली. ही घटना मुंबईतील घोडपदेव म्हाडा कॉलनीतील न्यू हिंद मिल कंपाऊंडमधील इमारतीत गुरुवारी पहाटे 03.40 वाजता घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत या नागरिकांची सुटका केल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

135 नागरिकांची केली सुटका :म्हाडा कॉलनीतील न्यू हिंद मिल कंपाऊंडमधील 24 मजली इमारतीत अचानक आग लागली. ही आग इलेक्ट्रिक मीटर केबिन, वायरिंग, केबल, इलेक्ट्रिक डक्टमधील स्क्रॅप मटेरियलला लागली होती. त्यामुळे या घटनाची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळावर दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी साडेसात वाजेपर्यंत ही आग अटोक्यात आणली. घटनास्थळावर अद्यापही बचावकार्य आणि कुलिंगचं काम सुरू असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

इमारतीच्या विविध मजल्यांवरुन नागरिकांना काढलं बाहेर : मुंबईतील न्यू हिंद मिल कंपाऊंडमधील 24 मजली इमारतीत गुरुवारी पहाटे आग लागली. आग लागल्याची घटना कळताच इमारतीत नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 135 नागरिकांना इमारतीतून सुखरुप बाहेर काढलं. यात अग्निशमन दलाच्या जवानांनी 25 नागरिकांना टेरेसवरुन, 30 नागरिकांना 15 व्या मजल्यावरुन बचावण्यात आलं. तर 80 नागरिकांना इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाण्याचे तीन टँकर दाखल झाले आहेत. पहाटे 03.40 वाजता लागलेली ही आग सकाळी 7.20 पर्यंत आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai Fire News : मुंबईतील न्यू पूनमबाग इमारतीला भीषण आग; आगीत होरपळून 96 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  2. Mumbai Fire News: झवेरी बाजार परिसरातील चायना बाजार इमारतीला लागली भीषण आग
  3. Mumbai Fire News : मुंबईत अग्नितांडव! 8 जणांचा होरपळून मृत्यू; 51 जखमी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली पाच लाखाची मदत
Last Updated : Nov 23, 2023, 11:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details