महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Fire : इमारतीला लागलेल्या आगीनं खळबळ, 50 ते 60 नागरिकांना काढलं इमारतीमधून बाहेर - मुंबई महापालिका

Mumbai Fire : कुर्ला परिसरातील इमारतीला आग लागल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या इमारतीमधून 50 ते 60 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.

Mumbai Fire
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 8:44 AM IST

Updated : Sep 16, 2023, 10:34 AM IST

मुंबई Mumbai Fire :इमारतीला लागलेल्या आगीत तब्बल 50 ते 60 नागरिकांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. ही घटना मुंबईतील कुर्ला परिसरातील इमारतीत शनिवारी सकाळी उघडकीस आली. इमारतीतून बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या इमारतीत लागलेल्या आगीवर ( Mumbai Fire ) आता नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.

तब्बल 39 नागरिक रुग्णालयात दाखल :मुंबईतील कुर्ला परिसरातील इमारतीला लागलेल्या आगीत तब्बल 50 ते 60 नागरिक अडकले होते. या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ सुरक्षितस्थळी हलवलं आहे. यातील 39 नागरिकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळावर बचावकार्य अद्यापही सुरुच असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.

आगीवर मिळवलं नियंत्रण :कुर्ला परिसरातील इमारतीला लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ दाखल होत बचावकार्य सुरु केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावरुन 50 ते 60 नागरिकांना बाहेर काढलं आहे. त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं वृत्तसंस्थेला देण्यात आली आहे.

शॉर्ट सर्कीटनं ही आग लागल्याचा संशय :कुर्ला परिसरात लागलेल्या आगीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आग लागल्याचं माहीत पडताच नगारिकांनी इमारतीत एकच धावपळ केली. ही इमारत रहिवासी परिसरातील असून या परिसरात मोठी वर्दळ असते. आग लागताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ इमारतीमधील 50 ते 60 नागरिकांना सुरक्षिस्थळी हलवलं आहे. पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्कीटनं ही आग लागल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली असून ही आग 12 व्या मजल्यापर्यंत पोहोचल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. ही पहिल्या पातळीवरची असल्याचं अग्निशमन दलाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. मात्र आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. Fire Mahalakshmi Mumbai : महालक्ष्मी परिसरात आग, अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश
  2. Building Fire Mumbai : टिळक नगर येथील रेल व्हीव इमारतीला आग
Last Updated : Sep 16, 2023, 10:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details