मुंबई - फोर्ट येथील कावासाजी पटेल रोडवर असलेल्या बाहुबली इमारतीमद्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत एक जण ३० ते ३५ टक्के भाजला आहे. दीपक दिलदार असे आगीत भाजलेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनेची माहिती होताच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
कावासाजी पटेल रोडवर बाहुबली इमारत आहे. या इमारतीमध्ये काम सुरू होते. तेव्हा अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत दीपक दिलदार (वय २२) हा तरुण ३० ते ३५ टक्के भाजला. त्याला उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती होताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ तर जम्बो वॉटरच्या ५ गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले.