महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शीना बोरा हत्या प्रकरण: इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांचा घटस्फोट मंजूर - mumbai court shina bora murder case

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मुंबईतील बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून पीटर मुखर्जीला तुरुंगातच सोडचिठ्ठी नोटीस पाठवण्यात आली होती.

इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी

By

Published : Oct 3, 2019, 9:27 PM IST

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मुंबईतील बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता या दोघात कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे.

हेही वाचा - मध्य प्रदेश हनीट्रॅप प्रकरण : एका आरोपीची अखेर पोलिसांसमोर कबूली..

८ नोव्हेंबर २००२ साली स्पेशल मॅरेज कायद्यानुसार व हिंदू पद्धतीनुसार पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचा विवाह झाला होता. दरम्यान, याआगोदर इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून पीटर मुखर्जीला तुरुंगातच सोडचिठ्ठी नोटीस पाठवण्यात आली होती. ज्यात दोघांच्याही एकमतानुसार लंडन, स्पेनसारख्या शहरातील संपत्ती आणि बँक खात्यातील फिक्स डिपॉजिट आणि इतर मालमत्तेची दोघांमध्ये समान वाटणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सर्व मागण्यांना पीटर मुखर्जी तयार झाला होता. दोघेही विवाह बंधनातून वेगळे होण्यासाठी सहमतीने तयार झाले असल्याने दोघेही कायदेशीररीत्या आता विभक्त झाले आहेत.

हेही वाचा - सातारा पोलीस अधिक्षकांची कारवाई; तिघांना एका वर्षासाठी तडीपार

ABOUT THE AUTHOR

...view details