महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Param Bir Singh : माजी गृहमंत्र्यांना तुरुंगात पाठवणारे परमबीर सिंह 'या' प्रकरणामुळे आले होते चर्चेत

शिंदे- फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले आहे. निलंबन मागे घेण्यासह सर्व आरोपही सरकारने फेटाळली आहेत. तसेच परमबीर सिंह हे जितक्या कालावधीसाठी निलंबीत होते, तो कालावधी हा त्यांच्या कर्तव्याचा मानला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Parambir Singh
Parambir Singh

By

Published : May 12, 2023, 10:15 PM IST

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे गेण्यात आले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आल्यानंतर त्यांचे निलंबन झाले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह या घटनेमुळे खूप चर्चेत आले होते. पण तुम्हाला माहिती का? परमबीर सिंह हे याआधीही खूप चर्चेत आले होते. मुंबईत अंडरवर्ल्डचे साम्राज्य असताना परमबीर सिंह हे भंडारा, चंद्रपूर याठिकाणी आपले कर्तव्य बजावत होते. तेथील काम पाहता त्यांची बदली मुंबईत करण्यात आली होती.

मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन केले दूर :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणी, भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. अँटिलिया बॉम्ब प्रकरणातही त्यांचे नाव आले होते, त्यानंतर त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते. परमबीर सिंह आणि 6 पोलीस अधिकाऱ्यांसह 28 इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

बांधकाम व्यावसायिकाला अटकेची धमकी :एका बिल्डरकडून पैसे उकाळल्याचा आरोप देखील परमबीर सिंह यांच्यावर होता. परमबीर हे मुंबई पोलीस आयुक्त झाले तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला होता. पुनामियाला नावाच्या इसमाला धमकी दिल्याप्रकरणी भाईंदरमधील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवत त्यांना अटक करण्याची धमकी दिली होती. तसेच पुतण्याची खोटी स्वाक्षरी घेऊन बनावट कागदपत्र बनवून परमबीस सिंह यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतली होती.

ज्यांनी नियुक्ती केली त्यांनाच पाठवले तुरुंगात :परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी 2020 मध्ये आले होते. त्यांच्या नियुक्तीची घोषणा अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली होती. अँटिलिया बॉम्ब प्रकरणात आपण अडकणार असल्याचे दिसताच परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मोर्चा उघडला. माजी गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला दर आठवड्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना तुरुंगात जावे लागले होते.

या पाच प्रकरणात चर्चेत आले परमबीर सिंह :महाविकास आघाडीच्या काळात 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी परमबीर सिंह यांच्याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होता. त्यानंतर कोरोनाकाळात नागरिकांनी फक्त दोन किमीच्या अंतरातच जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करावी असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते, हा आदेश माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना माहिती नव्हता. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात देखील परमबीर सिंह हे चर्चेत आले होती. टीआरपी रेटिंग घोटाळा रिपब्लिक टीव्हीने एक कंपनीच्या मदतीने टीआरपी रेटिंगमध्ये घोळ केला होता. याचा आरोप मुंबई आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. हे प्रकरण देशभरात गाजले होते, त्यामुळे परमबीर सिंह पुन्हा चर्चेत आले होते. पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची अटक प्रकरण हे खूप गाजले होते. सचिन वाझे यांनी गोस्वामीची अटक केली होती. अर्णब गोस्वामीची अटक अन्वय नाईक प्रकरणात झाली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं सापडल्याचे प्रकरण हे सर्वांना माहिती आहे. यातही परमबीर सिंह याचे नाव चर्चेत आले होते.

परमबीर सिंह यांचा प्रवास जाणून घ्या :परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून 29 फेब्रुवारी 2020 रोजी नियुक्ती झाली होती. परमबीर सिंह हे 1988 बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचे मूळ गावी हरियाणामध्ये आहे. परमबीर सिंह यांचे शिक्षण दिल्लीत झाले आहे. युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची निवड पहिल्यांदा आयआरएस कॅडरमध्ये झालेली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा देत आयपीएस हे पद मिळवले. परमबीर सिंह यांनी गवळी गँगमधील अनेकांचा एन्काउंटर केल्याचे सांगितले जाते. दरम्यान पूर्व,दक्षिण मुंबईत पोलीस उपायुक्त गुन्हे म्हणून काम केल्यानंतर सन 2002 मध्ये त्यांची बदली ठाणे ग्रामीणमध्ये करण्यात आली होती.

  • हेह वाचा -
  1. CBI Raid On Sameer Wankhede House : समीर वानखेडे यांच्या घरावर 'सीबीआय'ची छापेमारी, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
  2. Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई, शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्हावर अजूनही वाद
  3. Bawankule on Thackeray : उद्धव ठाकरे हे तर 'रडोबा'; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details