महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Dabewala on Bhagat Singh Koshyari: राज्यपालांच्या वक्तव्याचा मुंबईच्या डबेवाल्यांकडून निषेध - कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही निषेध करत असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटले आहे. या सोबतच राज्यपाल यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत वादग्रस्त विधान करू नये अशी विनंती देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे. (Mumbai Dabewala on Bhagat Singh Koshyari).

Mumbai Dabewala on Bhagat Singh Koshyari
Mumbai Dabewala on Bhagat Singh Koshyari

By

Published : Nov 19, 2022, 9:42 PM IST

मुंबई -औरंगाबाद येथील विद्यापीठाच्या दिक्षांत कार्यक्रमादरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्य वक्तव्यावर सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी (Mumbai Dabewala) देखील राज्यपाल यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. (Mumbai Dabewala on Bhagat Singh Koshyari).

मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर

महाराज आमचे कायम आदर्श राहतील - छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श तर होतेच. तसेच ते वर्तमान काळातही आमचे आदर्श आहेत. आणि भविष्यकाळात ही ते आमचे आदर्श असणार आहेत. पिढ्या न पिढ्या महाराजंच हे आमचे आदर्श होते, आहेत आणि कायम राहतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही निषेध करत असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटले आहे. या सोबतच राज्यपाल यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत वादग्रस्त विधान करू नये अशी विनंती देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे. या आधी ही छत्रपती शिवाजी महाराज आणी रामदास स्वामी यांचे बाबत असेच एक वादग्रस्त विधान केले होते. त्या वरून ही बराच गदारोळ झाला होता अशी आठवण देखील सुभाष तळेकर यांनी करून दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details