मुंबई - लंडनचे प्रिन्स हॅरी आणी मेघन या शाही दाम्पत्याला दोन दिवसापुर्वी पुत्ररत्न झाले. या घटनेचा आनंद बर्मिंगम, पॅलेससह सर्व इंग्लंडमध्ये साजरा करण्यात आला. डबेवाल्यांचा मित्र प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले व ब्रिटनच्या राजघराण्याला नवीन राजपुत्र मिळाल्याने मुंबईच्या डबेवाल्यांनीही हा आनंदसोहळा मुंबईत साजरा केला. या नवीन राजपुत्राला डबेवाल्यांनी चांदीच्या भेटवस्तू घेऊन त्या आज लोअर परेल येथील ब्रिटिश काऊन्सिलच्या अधिकाऱ्यांच्या हाती स्वाधीन केल्या.
लंडनच्या नव्या राजपुत्राला मुंबईच्या डबेवाल्यांनी दिली 'ही' खास भेट
परीसाने लोखंडाला जर स्पर्श केला की, लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. पण प्रिन्स चार्ल्स आम्हाला येऊन भेटले आमचे सोने नाही झाले पण जगात सोन्यासारखी चमक त्यांनी आम्हाला मिळवून दिली अशी प्रतिक्रिया डबेवाल्यांनी व्यक्त केली.
डबेवाल्यांना फारसे कोणी ओळखत नसताना प्रिन्स चार्ल्स डबेवाल्यांना भेटायला मुंबईला आले आणि त्यांनी डबेवाल्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. कौतुक करून ते थांबले नाही तर आपल्या दुसऱ्या लग्नाचे निमंत्रण त्यांनी डबेवाल्यांना दिले. डबेवालेही निमंत्रण मिळाल्यावर प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाला लंडन येथे गेले होते. परीसाने लोखंडाला जर स्पर्श केला की, लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. पण प्रिन्स चार्ल्स आम्हाला येऊन भेटले आमचे सोने नाही झाले पण जगात सोन्यासारखी चमक त्यांनी आम्हाला मिळवून दिली अशी प्रतिक्रिया डबेवाल्यांनी व्यक्त केली.
नवीन राजपुत्राचे आगमन राजघराण्यात झाले आहे. ज्याप्रमाणे एक मराठी आजोबा आपल्या नातवाला जी भेट देतो त्याप्रमाणे डबेवाल्यांनी नवीन राजपुत्राला हातातील वाळे, पायातील तोडे, कमरपट्टा या गळ्यातील गोफ या चांदीच्या वस्तू व गळ्यातील गोफामध्ये अडकवण्यासाठी हनुमानाची सोन्याची प्रतिमा दिली आहे. या मागील भावना ही आहे की, नूतन बालक हनुमानाप्रमाणे बलवान, सामर्थ्यवान, व्हावे, यावेळी डबेवाले असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर व पदाधिकारी दशरथ केदारी, अनंता तळेकर, डबेवाल्यांवर पीएचडी केलेले डॉ. पवन अग्रवाल तसेच सुरेश जावळे उपस्थित होते.