मुंबई :सप्टेंबर 2022 मध्ये, मुंबई विमानतळ कस्टम्सने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Mumbai International Airport ) 13 कोटी रुपयांचे 1.3 किलो कोकेन जप्त केले. पोलिसांनी घाना येथील एका प्रवाशाला 28 ऑगस्ट रोजी अटक केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पोटात कोकेन ड्रग्ज लपवून ठेवले होते. आरोपीला रुग्णालयात नेले असता त्याच्या पोटातून ८७ कॅप्सूल जप्त करण्यात आले.आणखी एका प्रकरणात, मुंबई कस्टमने अमेरिकेतून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आणि मुंबईत कार्यरत असलेल्या ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती.
31 किलो हेरॉईन जप्त :याआधी सात जानेवारी 2023 रोजी एकदा सीमेपलीकडून भारतात ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. पंजाबच्या फाजिल्का या सीमावर्ती प्रांतात अंमली पदार्थांवर कारवाई करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले होते. पोलिसांनी तस्करांकडून 31 किलो हेरॉईन जप्त केले आहे. (Fazilka police recovered 31 kg of heroine). आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. फाजिल्का पोलिसांनी 29 बॉक्समधून 31 किलो 200 ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (Fazilka police recovered 31 kg of heroine). याशिवाय पोलिसांनी घटनास्थळी हेरॉईनसह दोन तस्करांना देखील अटक केली आहे. (31 kg of heroine from Pakistan border).
भारतीय प्रवाशाला अटक : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सने एका भारतीय प्रवाशाला अटक केली, जो डफल बॅगमध्ये 28.10 कोटी रुपयांचे सुमारे 2.81 किलो कोकेन घेऊन जात होता.या प्रवाशाला सोशल मीडियावर भेटलेल्या व्यक्तींनी अमली पदार्थ घेऊन जाण्याचे आमिष दाखविल्याचे तपासात उघड झाले आहे. कस्टम अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रवाशाला तस्करीसाठी हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले होते.चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ३१.२९ कोटी रुपये किमतीचे ४.४७ किलो हेरॉईन आणि १५.९६ कोटी रुपये किमतीचे १.५९६ किलो कोकेन जप्त केले होते.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कोकेन आणि हेरॉईन जप्त केले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली होती.