महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फटाक्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, नराधमाला बेड्या - sexually abusing an eight year old boy

Child sexual abuse : आठ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीनं फटाका फोडण्याचे पीडित मुलाला आमिष दाखविलं होतं.

Child sexual abuse
Child sexual abuse

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 10:31 AM IST

Updated : Nov 17, 2023, 2:36 PM IST

मुंबई :फटाके देण्याचे आमिष दाखवून आठ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. अल्पवयीन मुलगा घराजवळ फटाके फोडत असताना ही घटना घडली. त्याला फटाके देण्याचं अमिष देऊन आरोपीनं त्याच्यावर लैंगिक अत्याचार केलाय. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीनं दिली होती. या प्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही छळाचे दोन गुन्हे :अँटॉप हिल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर मुलगा घरी गेला, तेव्हा त्यानं कोणाला काहीही सांगितलं नाही. मात्र आई-वडिलांनी त्याला रडताना पाहून कारण विचारलं असता, त्यानं घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर अँटॉप हिल पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीला अटक केलील आहे. याच आरोपीवर यापूर्वीही छळाचे दोन गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती देखील अँटॉप हिल पोलिसांनी दिली आहे.

आरोपीला अटक केली :आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली आणि पोलिसांनी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला. अँटॉप हिल पोलिसांनी सांगितले की, आरोपींवर यापूर्वीही छळवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

मुलावर अनैसर्गिक अत्याचार :मंगळवारी दिवाळीनिमित्त पीडित मुलगा त्याच्या मित्रांसोबत घराजवळ फटाके फोडत होता. त्याचवेळी आरोपी तिथं आला. त्यानंतर त्यानं लहान मुलाला आणखी फटाके फोडण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर आरोपीनं त्याला सोबत घेऊन जवळच्या इमारतीत नेलं. तेथं नेऊन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. एवढंच नाही तर या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही मारेकऱ्यानं दिली.

यापूर्वी गुन्हे दाखल :घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलानं घरी येऊन सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर बुधवारी अँटॉप हिल पोलिसांनी अनैसर्गिक छळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. तो कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. आरोपींविरुद्ध अँटॉप हिल, माटुंगा पोलिस ठाण्यात विनयभंग, असभ्य वर्तनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित कुटुंबासह अन्य नागरिक करत आहेत.

हेही वाचा -

  1. वारजेतील रामनगर परिसरात तीन दुचाकी पेटवल्या; पाच वाहनांचे नुकसान
  2. Raped On Doctor Woman : महिला डॉक्टरवर नराधमाचा बलात्कार; फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले पैसे
  3. India Vs New Zealand Match : भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान घातपाताची धमकी देणारा 17 वर्षीय युवक ताब्यात
Last Updated : Nov 17, 2023, 2:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details