महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Molestation Case : रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेचा विनयभंग, आरोपीनं काढला पळ - Woman molested on Lower Paral

लोअर परळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. 28 ऑगस्ट रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली होती. मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

Molestation Lower Paral
Molestation Lower Paral

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 8:53 PM IST

मुंबई :लोअर परळ परिसरात अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालयं आहेत. तसंच लोअर परळ रेल्वे स्थानकात कायम प्रवाशांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीनं महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्टला सायंकाळी 6 ते 7 च्या सुमारास लोअर परळ रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1वर प्रवाशांची गर्दी होती. एका तरुणानं याचा फायदा घेत प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट पाहणाऱ्या एका महिलेची छेड काढली. नंतर तिच्यावर हल्ला करून तो पळून गेला.

विनयभंगाचा गुन्हा दाखल :मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत यांनी 'ईटीव्ही भारत'शी' बोलताना सांगितले की, 'काल सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ट्रेन पकडण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेच्या खांद्यांला स्पर्श करून एक अज्ञात इसम ट्रेननं पळून गेला. या प्रकरणी तरुणीनं तक्रार दाखल केल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रकारे आरोपीला पकडण्यासाठी लोअर परेल रेल्वे स्थानकावरील सीसीडी फुटेज देखील तपासलं जात आहे'.

लोकलमध्ये अश्‍लील चाळे : पीडित महिलेनं मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक कारण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. चार दिवसांपूर्वीच चालत्या लोकलमध्ये एका 19 वर्षांच्या तरुणीसोबत अश्‍लील चाळे करण्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्थानकादरम्यान घडला होता. या प्रकरणी अंधेरी रेल्वे स्थानकात तरुणीच्या तक्रारीवरुन अंधेरी रेल्वे पोलिसांनी भरत बहादूर पंडित (वय 26) नावाच्या आरोपी तरुणाला अटक केलीय.

महिलांची सुरक्षा वाऱ्यावर :पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या भरत पंडित या तरुणाला मिनाक्षी कळंबे, मिनाक्षी सरवदे, सविता सातव, नविता तांडेल यांनी शिताफीने चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं. तरुणीनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी भरत पंडितविरुद्ध ३५४ अ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. भरत हा मूळचा बिहारच्या मधुबनीचा रहिवाशी असून सध्या विलेपार्ले परिसरात राहत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव महाजन यांनी सांगितलं होतं. मात्र, पुन्हा महिलेच्या विनयभंगाची घटना लोअर परळ रेल्वे स्थानकात घडल्यानं महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा -

  1. Thane Crime News : भावाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे; बहीण करत होती व्हिडिओ, दोघांना अटक
  2. Brother Rape Sister : रक्षा बंधनलाच नात्याला काळिमा : 18 वर्षीय भावाचा अल्पवयीन बहिणीवर बलात्कार
  3. Woman Met Pak Boyfriend : संभाजीनगरच्या महिलेनं गाठली बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी दुबई, 'ट्रॅव्हल हिस्ट्री'च्या शोधात एटीएस

ABOUT THE AUTHOR

...view details