महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भायखळ्यातील 'त्या' गोळीबार प्रकरणी आरोपीला दिल्लीतून अटक

Mumbai Crime News : मुंबईच्या माजगाव इथं झालेल्या गोळीबार प्रकरणी भायखळा पोलिसांनी आरोपींना अटक केली. यातील एका आरोपीला पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात आलीय.

Mumbai Crime News
Mumbai Crime News

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 7:31 AM IST

Updated : Dec 2, 2023, 4:51 PM IST

मुंबई Mumbai Crime News : मुंबईतील भायखळाजवळील माजगाव इथं झालेल्या गोळीबार प्रकरणात भायखळा पोलिसांकडून दोघांना याआधीच अटक करण्यात आलीय. आता या गोळीबार प्रकरणी तिघांना नव्यानं अटक करण्यात आलीय. या तिघांपैकी गोळीबार करणाऱ्या एका आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.


तिघांना अटक : माजगाव इथल्या अफजल बिर्याणी या हॉटेल जवळ 18 नोव्हेंबरला मध्यरात्री 3:00 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. त्यात एक नागरिक किरकोळ जखमी झाला होता. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणी मोटरसायकल चालवणारा इम्रान उर्फ बाबू अब्दुल रहेमान शेख, पिस्तूल पुरवणारा औरंगजेब उर्फ शेरु ताहीर खान आणि गोळीबार करणारा अहमद मोहम्मद अख्तर शेख यांना अटक करण्यात आलीय.


गोळीबारात तक्रारदाराला दुखापत : तक्रारदार मोहसीन अखिल सलमानी हे डॉ शिवदास चापची रोड, माझगाव वेलकम ड्रेसच्या दुकानासमोर बसले असताना एका दुचाकीवरुन दोन अज्ञात आरोपींनी पिस्तूलमधून गोळी झाडली. त्यामुळं मोहसीनच्या उजव्या पायाच्या तिसऱ्या बोटास दुखापत झाली होती. भायखळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी इम्रान उर्फ बाबू अब्दुल रहेमान शेख (मोटर सायकल चालविणारा) आणि औरंगजेब उर्फ शेरु ताहीर खान यांना 22 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. तसंच या गुन्ह्यात दोन संशयित आरोपी असून त्यासाठी दोन पथकं उत्तर प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यात पाठवण्यात आली होती.


आरोपीला दिल्लीतून अटक : या गुन्हयात गोळीबार करणारा पाहिजे आरोपी हा दिल्ली इथं असल्याबाबत खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ दिल्ली इथं भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील आणि ताडदेव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश जोष्टे आणि पथक रवाना होऊन आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेतलं. यानंतर आरोपीला पोलीस ठाण्यात आणून आरोपी अहमद मोहम्मद अस्तर शेख उर्फ गुन्ना पठाण याला 30 नोव्हेंबरला अटक करण्यात आली.

हेही वाचा :

  1. रेल्वे अधिकाऱ्यांवर सीबीआयची छापेमारी, लाच घेताना रंगेहाथ पकडले
  2. बिहारमध्ये एकतर्फी प्रेमातून रक्तरंजीत खेळ! छठपूजेवरून परतणाऱ्या 6 जणांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू
  3. Home Drug Factory : नायजेरियन व्यक्ती घरात चालवत होता ड्रगचा कारखाना, १० कोटींचं घबाड जप्त
Last Updated : Dec 2, 2023, 4:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details