महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News : मित्रानेच पळविले ७० लाखांचे सोने, एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai Crime News : झवेरी बाजारमध्ये (Zaveri Bazar) सोने विकण्यासाठी आलेल्या जोगेश्वरी येथील व्यावसायिकाचे ७० लाखांचे सोने त्याच्याच मित्राने घेऊन पळ काढला आहे. व्यावसायिकाचा मित्र सोने विकण्यासाठी आला होता. याप्रकरणी लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी (LT Marg Police Station) चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे.

Mumbai Crime News
मित्रानेच पळविले ७० लाखांचे सोने

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 9:37 PM IST

मुंबईMumbai Crime News : जोगेश्वरी येथील व्यापारी शहाबुद्दीन इकबाल मंडई (वय ३०) हे सोन्याचे दागिने विकण्यासाठी झवेरी बाजार (Zaveri Bazar) येथील अरिहंत टच सेंटरमध्ये आले होते. सोन्याचे वजन करत असताना जगदीश बगाराम माली याने शहाबुद्दीनची नजर चुकवून काउंटरवरून सोन्याची बॅग घेऊन पळ काढला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 70 लाख रुपये किंमतीचे 1270 ग्रॅमचे दागिने चोरीला गेले आहेत. २६ ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, मित्र परत येईल म्हणून शहाबुद्दीनने १ दिवस वाट पहिली नंतर त्याने शनिवारी एलटी मार्ग पोलिसात (LT Marg Police Station) जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी जगदीश माली या मूळचा राजस्थानचा असलेल्या व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

एलटी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार:एलटी मार्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जगदीश बगराम माली हा तक्रारदाराचा मित्र असून तोही त्याच्यासोबत आला होता. दागिने विकण्यासाठी शहाबुद्दीन मंडई झवेरी बाजारातील ज्वेलर्सकडे गेल्यावर जगदीश मालीने शहाबुद्दीनला पाच मिनिटांत येतो असं सांगितलं आणि निघून गेला. बराच वेळ माली न आल्याने मंडईने त्याला मोबाईलवर कॉल केला. मात्र, मोबाईल फोन बंद येत होता. दरम्यान, शहाबुद्दीन मंडईला त्याच्याजवळ असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग दिसली नाही. त्यानंतर दुकानात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर माली दागिन्यांची बॅग घेऊन निघून गेल्याचे त्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यामुळे तक्रारदार शहाबुद्दीन मंडई यांनी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात मित्र जगदीश माली विरोधात तक्रार दाखल केली.

आरोपीचा शोध सुरू : माली याच्या ओळखीने सोने व्यापारी असलेला शहाबुद्दीन मंडई हे तक्रारदार सोने विकण्यास झवेरी बाजारमधील व्यापाराकडे आले असल्याची माहिती, पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. अद्याप आरोपीचा सुगावा लागला नसून एलटी मार्ग पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. बनावट चावीने घरात घुसून २३ तोळे सोने लंपास करणाऱ्या तिघा सख्ख्या बहिणींना बेड्या
  2. लाखो रुपयांचे सोने चोरणारे दोघे अटकेत; १० लाखांचा मुद्देमाल जप्त
  3. दीड कोटींचे सोने घेऊन पसार झालेल्या आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक!

ABOUT THE AUTHOR

...view details