महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Father Rape Daughter : जन्मदात्या पित्याकडून अल्पवयीन मुलीवर २ वर्ष लैंगिक अत्याचार - Shivaji Nagar Police Station

Father Rape Daughter : मुंबईतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी लज्जास्पद घटना घडली आहे. तेरा वर्षीय पोटच्या मुलीवर नराधम बापाने बलात्कार केल्याची घटना (Father Rapes 13 Year Old Daughter) घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime News
मुलीवर २ वर्ष लैंगिक अत्याचार

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 10:46 PM IST

Updated : Nov 5, 2023, 10:53 PM IST

मुंबई Father Rape Daughter : मुंबईच्या गोवंडी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचे वडीलच गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार (Father Rapes 13 Year Old Daughter) करत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) नराधम पित्याला अटक केली आहे. तर धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वडिलांनी केला लैंगिक अत्याचार : अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचं मुलीच्या आईच्या लक्षात आले. तिने मुलीला विचारलं तेव्हा हे सगळं गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याचं ऐकून आईला धक्काच बसला. एवढे दिवस मुलगी का गप्प होती, असं विचारल असता या सगळ्याची बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची वडिलांनी धमकी दिल्याचं देखील मुलीनं सांगितलं.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेरा वर्षीय पोटच्या मुलीवर नराधम बापाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली आहे - राज तिलक रोशन, पोलीस उपायुक्त

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल : ही घटना समजताच आईने तत्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी देखील एक क्षणही न दवडता तत्काळ गुन्हा दाखल केला आणि या नाराधम पित्याला ताब्यात घेतलं. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवर शिवाजीनगर पोलिसांनी बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला शनिवारी रात्री अटक केली.

हेही वाचा -

  1. Minor Girl Rape Case : बाप लेकीच्या नात्याला काळिमा, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बापाची आत्महत्या
  2. Thane Crime News: धक्कादायक! विधिसंघर्ष बालकाचा चिमुरडीवर अत्याचार; विधिसंघर्ष बालकाची रवानगी बालसुधार गृहात..
  3. Minor Girl Gang Rape : धक्कादायक! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पाचही आरोपी फरार
Last Updated : Nov 5, 2023, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details