मुंबईMumbai Crime News :दादर परिसरातील ऋषभ टॉवरमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरात एप्रिल 2023 पासून आज तागायत बिहारहून आलेल्या, एका नोकरानं चोरी केली आहे. तब्बल 90 लाखांची चोरी करण्यात आली आहे. दादर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 13 ऑक्टोबरला दादर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police Station) भारतीय दंड संविधान कलम 381 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वडिलोपार्जित फर्निचरचा व्यवसाय : जितेन मिस्त्री हे पत्नी, मुलगी, मोठा भाऊ, वहीनी व त्यांचा मुलगा व आई यांच्यासह एकत्र राहावयास आहे. जितेन यांचा वडिलोपार्जित फर्निचरचा व्यवसाय दादर परिसरात आहे. जितेन मिस्त्री यांचं ऋषभ टॉवर मध्ये 5 बीएचके घर आहे. त्यात एका रूममध्ये आई वडील राहाचे. परंतु 5 एप्रिल 2023 ला वडीलांचं निधन झाल्यानं सध्या आई त्या रूममध्ये एकटी राहते. तसेच या रूममध्ये कपाटात मौल्यवान दागिने व पैसे ठेवलेले असायचे. त्या कपाटाची चावी बाजुला उघडया असलेल्या कपाटाच्या कप्प्यात ठेवलेली असते.
2021 मिस्त्री यांच्याकडं नोकरी : जितेन एकत्र परिवारासह राहावयास असल्यानं घरात काम करावयास एक मुलगा ठेवायचं ठरवलं होतं. त्यांनतर शेजाऱ्यांकडून विद्यानंद उपेंद्र पासवान उर्फ विरेंद्र बाबत कळालं व त्याला बोलावून नोकरीस ठेवलं. विरेंद्र पासवान हा धरभंगा, बिहारचा होता. त्याच्या विषयी चांगली माहिती प्राप्त झाल्यानं, त्याला कामाला साधारण अडीच वर्षापुर्वी म्हणजे जानेवारी 2021 ला नोकरीला ठेवलं होतं. तेव्हापासून तो मिस्त्री यांच्याकडं नोकरी करत करायचा. तसेच तो एकटा मिस्त्री यांच्या घरी रात्री राहत असायचा. त्याचे मिस्त्री परिवारासोबत चांगले संबंध तयार झाले होते.
पैसे चोरत असल्याबाबत संशय :2022 मध्ये दिवाळीच्या वेळी जितेन यांचं वडील आजारी पडले होते. व त्यांना दुर्दर आजार झाला असल्यानं त्यांची विद्यानंद उपेंद्र पासवान चांगल्याप्रकारे काळजी घेतली होती. परंतु वडील मरण पावल्यानंतर मागील काही दिवसापासून विद्यानंद उपेंद्र पासवान हा घरातील काही मौल्यवान वस्तू व पैसे चोरत असल्याबाबत संशय येत होता. घरातील व कपाटातील वस्तु आस्ताव्यस्त पडलेल्या दिसायच्या, पण त्याने वडीलांची सेवा केली असल्यानं त्याचेकडं दुर्लक्ष करायचो, असं तक्रारीत जितेन मिस्त्री यांनी सांगितलं.
उडवाउडवीचं दिलं उत्तर :12 ऑक्टोबरला जितेन आपल्या परिवारासह घरी हजर असताना, सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घरातील नोकर विद्यानंद उपेंद्र पासवान हा पैसे चोरत असल्याबाबत जितेन यांना दिसला. त्याला बोलण्यासाठी गेलो असता त्यानं जोरात बोलण्यास सुरुवात करून वाद घालत उडवाउडवीचे उत्तर दिली. त्यानंतर जितेन यांना संशय आला व घरात आईला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर आईने जितेनला सांगितलं की, वडिलांनी काही पैसे व वडिलोपार्जित सोने कपटात ठेवले होते, त्यांचे निधन झाल्यापासून ते पैसे व सोने पाहिले नाहीत. तर विरेंद्रने त्यातीलच पैसे घेतले असावे. त्यानंतर कपाटात तपासून पाहिले असता ते मिळून आले नाही.
अशी घडली घटना : त्यानंतर कपाटातील सोने तपासून पाहिले असता तेही मिळून आले नाही. आईने मला सांगितले की, तुझ्या वडिलांनी 50 लाख रूपये माझ्याकडे ठेवण्यासाठी दिले होते व ते मी या कपाटात ठेवले होते. तसेच आम्ही दोघांनी व्यवसायातून बचत करून 100 ग्रॅम वजनाची एकूण 8 बिस्कीट व 50 ग्रॅम वजनाची 4 बिस्कीट तयार केली होती. ती याच कपाटात ठेवली होती. त्यानंतर ठेवलेली पैसे व सोने कपाटात तपासून पाहिले असता ते मिळुल आले नाही. त्यानंतर जितेनला खात्री पटली की, आईने ठेवलेले 50 लाख रुपये कॅश व सोने विरेंद्र पासवान याने वेळोवळी आईच्या बेड रूममधील कपाटाच्या चाव्या घेऊन चोरी केले आहे. म्हणुन जितेनला तात्काळ पोलीसांना फोन करून बोलावले. त्यानंतर काहीवेळात पोलीस आले आणि त्यांनी विरेंद्रला ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा -
- Thieves Stole Jewelry : ज्वेलरी शोरूम फोडली, 25 कोटी रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला
- ज्योतिषाकडून मुहूर्त काढून केली चोरी...बारामतीतील १ कोटी रुपयांच्या चोरीचा असा लागला छडा
- Theft Nalanda Hospital : पाच वर्षे रुग्णालयात घेतले मोफत उपचार, अचानक रुग्णानं मृतदेहावरचे चोरले दागिने