मुंबई : पब्जी गेम खेळत असताना दोघांनीही आपले प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली, पण पब्जीचे प्रेम जास्त काळ टिकले नाही. पीडितेच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी राजस्थानमधून पब्जी प्लेयरला अटक केली. जस्सी सिंग उर्फ काळूराम हा बनावट इंस्टाग्राम आयडी बनवून मुलींना प्रेमात अडकवायचा, त्यांनी नकार दिल्यावर त्यांची बदनामी करत होता, असे तपासात समोर आले. या प्रकरणी कुरार पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
विनयभंग आणि बदनामीचा गुन्हा : 22 वर्षीय विद्यार्थिनीची पब्जी गेम खेळत असताना काळूराम (24) या तरूणासोबत ओळख पटली. दोघेजण एकमेकांना ओळखू लागले. ओळख वाढली, प्रेम झाले, बोलू लागले, प्रेम वाढू लागले, प्रियकर आणि प्रेयसी दोघांनीही आपला मोबाईल नंबर शेअर केला. नंतर प्रेयसीने काळूरामला नकार दिला असता, तू माझ्याशी मैत्री केली नाहीस तर मी तुझी बदनामी करेन, असे काळूरामने सांगितले. त्याने प्रेयसीचे काही इंटिमेट फोटो तिच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत शेअर केले होते. वारंवार समज देऊनही जेव्हा काळुरामने आपल्या पब्जी प्लेयर प्रेयसीचे फोटो व्हायरल करणे थांबवले नाही, तेव्हा प्रेयसीने कुरार पोलिसांना सत्य सांगितले. काळूरामवर विनयभंग आणि बदनामीसह आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.