महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : महिलेला जिवंत जाळल्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा - दीपक जाठ

Mumbai Crime : लैंगिक छळाविरोधात आवाज उठवणाऱ्या एका महिलेला जिवंत जाळल्या प्रकरणी न्यायालयानं आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. दीपक जाठ असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 11:01 PM IST

मुंबई Mumbai Crime:स्थानिक महिलेच्या लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेसह तीन वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याप्रकरणी सत्र न्यायालयानं 39 वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. दीपक जाठ असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्यांला सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. सुब्रमण्यम यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावलीय. दीपक जाठ परिसरातील एका महिलेचा लैंगिक छळ करत असल्याबद्दल एका महिलेनं आवाज उठवला होता. त्यामुळं आरोपी दीपकनं महिलेवर 14 एप्रिल 2017 रोजी पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता.



महिलांचा छळ :2017 मध्ये आरोपी दीपक जाट महिलांचा लैंगिक छळ करायचा. त्यामुळंच स्थानिकांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरून त्यानं परिसरातील महिलांचा बदला घेण्याचं ठरवलं होतं. मुंबईच्या वांद्रे उपनगरात वांद्रे रेकलेमेशन जवळील झोपडपट्टीतील ही घटना आहे. महिलेवर पेट्रोल टाकल्यानंतर आरोपी दीपक जाट घटनास्थळावरून पसार झाला होता.

उपचारादरम्यान मृत्यू :पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, 18 वर्षीय एक तरुणी घटनेच्या दिवशी शेजाऱ्यांसोबत घराबाहेर बसली होती. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपीनं तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. या घटनेत शेजारी राहणारी मुलगी, तीन वर्षांची मुलगी जखमी झाली होती. त्यानंतर तरुणीसह तीन वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.


गंभीर गुन्ह्यामुळं मरेपर्यंत फाशी :मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायालय क्रमांक 19 चे न्यायाधीश ए सुब्रमण्यम यांनी फिर्यादी तसंच बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. याबाबत न्यायालयानं म्हटलंय की, 'एकाच वेळी अनेक महिलांवर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा आरोपीनं प्रयत्न केला आहे. त्यात एका लहान मुलीचाही समावेश आहे. त्यामुळं आरोपी दीपक जाटला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे.



हेही वाचा -

  1. Mumbai Crime News : मुंबईत अमली पदार्थाची तस्करी; 505 ग्रॅम चरससह यूपी बिहारमधून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
  2. Death Threat To Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या जीवाला खरंच धोका आहे का? 2021 पासून आजतागायत किती वेळा आल्या धमक्या?
  3. Man Beaten Woman Teacher : अश्लील मेसेज पाठवल्यानं महिला शिक्षिकेची पोलिसात तक्रार; राग आल्यानं आरोपीकडून पीडितेला मारहाण

ABOUT THE AUTHOR

...view details