महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime: बनावट व्हिसा देऊन अनेकांना पाठविले विदेशात, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष पाचने बनावट व्हिसा प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी बनावट रबरी शिक्के तयार करून त्याव्दारे बनावट पासपोर्ट, बनावट व्हिझा, बनावट कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्र, बनावट बँक अकाउंट स्टेटमेंट बनवत होते. इम्तियाज हानिफ शेख (६४) आणि सुधीर सुर्यकांत सावंत (३८) अशी या अटक दोन आरोपींची नावे आहेत.

By

Published : Jan 26, 2023, 9:51 AM IST

Mumbai Crime
आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

बनावट व्हिसा प्रकरण उघड

मुंबई :डी एन नगर पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि कलम ४७३, ३४ भा.द.वि. सह कलम १२ भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना बनावट पासपोर्ट, बनावट व्हिझा, बनावट लसीकरण प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणे, असे काम ही टोळी करत होती.



हकीकत अशी :गुन्हे शाखा, कक्ष पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी यांना रूम नं. ११२, शिवशक्ती सोसायटी को. ऑ.हौ.सा.लि., मधुबन टॉवरच्या समोर, डी. एन. नगर मेट्रो स्टेशनच्या जवळ, अंधेरी पश्चिम याठिकाणी बनावट पासपोर्ट, व्हिझा बनविण्यात येत असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखा कक्ष पाचचे अधिकारी आणि अंमलदार यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मोठया कुशलतेने छापा टाकून बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या आरोपीना जेरबंद केले.



साहीत्य जप्त करण्यात आले : या छाप्यात आरोपींच्या ताब्यातील एकूण २८ विविध व्यक्तीचे पासपोर्ट विविध व्यक्तींचे व विविध देशांचे एकुण २४ व्हिझा, बनावट व्हिझा बनविण्याकरीता उपयोगात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. इतर देशांच्या इमीग्रेशन डिपार्टमेंटचे बनावट रबरी शिक्के, बँक शाखेचे एकूण ४० रबरी शिक्के, जे. जे. रुग्णालय येथील वैदयकीय अधिकारीच्या नावे असलेले बनावट रबरी शिक्के, असे एकूण ४१४ रबरी बनावट शिक्के, स्टॅम्पींग मशीन, लॅमीनेशन मशीन, असे इतर संगणकीय साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

अनेक व्यक्तींना बनावट पासपोर्ट : या कारवाई दरम्यान एकूण २ आरोपीना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक व्यक्तींना बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशात पाठविले होते. या गुन्हयातील अटक आरोपी इम्तियाज हानिफ शेख (६४) आणि सुधीर सुर्यकांत सावंत (३८) यांना न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता न्यायालयाने या आरोपीना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.



यापूर्वी देखील दोन्ही आरोपींना दिल्ली पोलिसांनी केली होती अटक :दोन आरोपींनी एका व्यक्तीस बोगस पासपोर्ट आणि व्हिजा दिल्यानंतर ती व्यक्ती कुवेत येथे गेली होती. मात्र, कुवेत येथील संबंधित प्रशासनाने त्या व्यक्तीला बोगस पासपोर्ट प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला भारताकडे रिपोर्ट केल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने कोणाकडून पासपोर्ट आणि व्हिजा बनवून घेतला याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी इम्तियाज शेख आणि सुधीर सावंत या दोघांना अटक केली होती. ऑगस्ट महिन्यात या दोन आरोपींना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.


हेही वाचा: Thane Crime कारागृहातील क्वारन्टाईन सेंटरमधून पळालेल्या कुख्यात गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ABOUT THE AUTHOR

...view details