मुंबई Illegal Gambling Mumbai : शुक्रवारी(1 डिसेंबर) पोलिसांनी खारमधील (Khar) एका इमारतीमध्ये छापा टाकला होता. यावेळी तब्बल 45 जण जुगार खेळताना आढळून (Illegal Gambling Racket Khar) आले होते. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सर्व ४५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व 45 जणांना अटक केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) दिली.
रहिवाशांनी दिली होती तक्रार :मुंबई पश्चिम उपनगरातील आंबेडकर रोडवर असलेल्या ओम पॅलेस इमारतीतील रहिवाशांनी गुन्हे शाखेकडे जुगार खेळण्याबाबत तक्रार केली होती. जुगारामुळं या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होत होता. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून, 45 जणांना अटक केली आहे. यात 4 जण हा जुगाराचा अड्डा चालवत होते. यावेळी तिथे 12 महिलांसुद्धा उपस्थित होत्या. घटनास्थळावरुन 34 लाख रुपयांची रोकड, 1 कोटी रुपयांची प्लास्टिकची नाणी आणि सट्टा लावण्यासाठी वापरल्या जाणार्या वस्तू जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता आणि जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.