महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात प्लास्टिक कंपनीला आग, 1 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज - arrested accused with pistol

mumbai crime branch arrested accused with pistol
ब्रेकिंग न्यूज

By

Published : May 25, 2021, 8:10 AM IST

Updated : May 25, 2021, 12:29 PM IST

12:27 May 25

भंडाऱ्यात प्लास्टिक कंपनीला आग, 1 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज

भंडारा - तालुक्यातील पालगाव येथे असलेल्या उमा प्लास्टीक कंपनीला भीषण आग लागली आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपासून ही आग लागली असून दुपारी बारापर्यंत ही आग विझविण्याचे काम सुरू होते. आगीमध्ये जवळपास 80 लाख ते 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कंपनी मालकांनी व्यक्त केला आहे. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, कंपनीमध्ये असलेल्या केमिकल बॅगमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

10:43 May 25

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा मुंबई सायबर सेलने नोंदवला जबाब

मु़ंबई- फोन टँपिग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा मुंबई सायबर सेलने जबाब नोंदवला. जबाबात शुक्ला यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबई हायकोर्टाने शुक्ला यांचा जबाब नोंदवण्याबाबत परवानगी दिली होती. त्यानुसार हैद्राबादला जाऊन मुंबई सायबर पोलिसांनी शुक्ला यांचा जबाब नोंदवला. यापुर्वी दोन वेळा सायबर सेलकडून चौकशीला हजर राहण्यासंदर्भात समन्स शुक्ला यांना बजावण्यात आले होते. या प्रकरणी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

10:24 May 25

नागपुरात व्यावसायिक सागर भटेवार यांच्या सदनिकेत ईडीकडून शोधमोहीम

नागपूर- नागपूरच्या शिवाजी नगर भागात हरे-कृष्णा अपार्टमेंटमध्ये ईडी कडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. सागर भटेवार नावाच्या व्यावसायिकाच्या सदनिकेत शोधमोहीम सुरू आहे. आज सकाळी ईडीचे अधिकारी सागर भटेवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. एका मोठ्या नेत्याशी व्यायसायिक संबंध असल्यामुळे हे सर्च ऑपरेशन होत असल्याची माहिती पुढे येत आहे. इडीचे तीन अधिकारी ईडीच्या पथकात सहभागी असून असून ते विचारपुस करत आहेत.

09:14 May 25

आदित्य नारायणने मागितली अलिबागकरांची माफी

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीआदित्य नारायणला इशारा दिला होता. त्यानंतर आदित्य नारायणने फेसबुक पोस्ट करत अलिबागकरांची माफी मागितली आहे. आदित्य नारायण म्हणतो की, मी नम्रपणे हात जोडून अलिबागच्या लोकांची माफी मागतो. माझ्या अलीकडच्या एपिसोडमध्ये मी अलिबागबद्दल जे विधान केले त्यावरून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा कधीही कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता मला अलिबागबद्दल प्रेम आणि आदर आहे. माझ्याही अलिबाग ठिकाणाशी अनेक भावना जोडलेल्या आहेत. तिथले लोक आणि मातीचा मला आदर आहे असं त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

08:01 May 25

बोरीवलीतून पिस्तूल आणि जीवंत काडतुसासह आरोपीला अटक

मुंबई- बोरीवली भागातून क्राइम ब्रांचच्या 11 युनिटने एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीपासून 1 पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे जप्त केली आहे. आरोपीचे नाव कादर बादशाह (वय 38) आहे. प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच आरोपीविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये 20 गुन्ह्यांची नोंद आहे.  

Last Updated : May 25, 2021, 12:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details