मुंबई -विमा कंपनीकडून येणे असलेली रक्कम जास्त फायद्यांसह मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका लेखापालाला(अकाऊंटट) कोट्यवधी रुपयांना फसवल्याची घटना समोर आली. पीडित लेखापालाची 3 कोटी 88 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना क्राईम ब्रँच युनिट-6 ने अटक केली. अटक केलेले आरोपी हे आंतरराज्यीय टोळीचे सदस्य आहेत. त्यांनी देशातील वेगवेगळ्या राज्यात शेकडो लोकांना करोडो रुपयांचा चुना लावला आहे.
मुलीच्या नावाने उघडली होती पॉलिसी -
या प्रकरणातील पीडित तक्रारदार राजेंद्र मंडविया यांनी त्यांच्या मुलीच्या नावाने 20 लाख 89 हजार रुपयांची विमा पॉलिसी काढली होती. या पॉलिसीचा प्रीमियम हा वेगवेगळ्या टप्प्यात भरायचा होता. सरतेशेवटी प्रीमियम परवडत नसल्यामुळे त्यांनी ही पॉलिसी बंद केली होती. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना या पॉलीसीचे 18 लाख 2 हजार रुपये मिळाले होते. मात्र, उर्वरित 2 लाख 87 हजारांची रक्कम मिळायची बाकी होती. आरोपी व्यक्तींनी मंडविया यांच्याशी संपर्क साधून विमा कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. एनओसी, सीआयारडीसी चार्जेस, टीडीएस चार्जेस व वकील फीच्या नावाखाली मोठी रक्कम मिळवून देतो, असे सांगून त्यांना वेगवेगळ्या 48 बँक खात्यांमध्ये 3 कोटी 88 लाख रुपये भरण्यास भाग पाडले.
अनेक राज्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल -