मुंबई :दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटनांचे नवीन प्रकार समोर येत आहे. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. त्यात मूळचे दिल्लीचे रहिवासी असलेले तक्रारदार अमीर अली यांचा इम्पोर्ट एक्स्पोर्टचा बिजनेस आहे. व्यवसायाच्या माध्यमातून किर्गीझस्तान येथील रहिवासी इसकेंदर उल्लो यांच्याशी त्यांची ओळख झाली. उल्लो यांची अल्प इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाची भारतात कंपनी आहे. उल्लू आणि अमीर यांच्या कंपनीची कार्यालय एकाच इमारतीत आहेत. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात उल्लो याने अमीर यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या देशात मोठ्या प्रमाणात साखरेची कमतरता आहे. त्यांच्या ओळखीच्या जुमान्झराव कोचकोरबेक यांची के.जी. इन्वेस्ट कंपनी आहे. त्यांना तात्काळ 12000 मेट्रिक टन साखर खरेदी करायची असल्याचे सांगितले.
साखर निर्यातदारांची माहिती : त्याचप्रमाणे पुरवठा करणाऱ्या कंपनीची माहिती घेण्यास सांगताच त्यांनी अमीर यांची हरियाणामधील रोहित शर्माच्या ओळखीतून मुंबईतील किशोर आणि काशिनाथ जाधव या दोन साखर निर्यातदारांची माहिती दिली. काशिनाथ जाधव यांची रॉयल ऍग्रो मार्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. त्यानुसार किशोर आणि काशिनाथ यांना साखरेची ऑर्डर देण्यात आली. 12 हजार मॅट्रिक टन साखरेचे ऑर्डर देत ठरल्याप्रमाणे ॲडव्हान्स म्हणून 24 कोटी रुपये रक्कम जाधव यांच्या कंपनीच्या खात्यावर पाठवली.