महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई पोलीस आयुक्त अडचणीत, पोलीस दलात मोठ्या फेरबदलांची शक्यता - मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग बदली न्यूज

सचिन वाझे प्रकराणानंतर महाविकास आघाडीत खलबत सुरू आहेत. तसेच यासंदर्भातील बैठकांचा जोरदेखील वाढला आहे. मुंबई पोलीस दलामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Parambir Singh
परमबीर सिंग

By

Published : Mar 16, 2021, 11:14 AM IST

Updated : Mar 16, 2021, 2:02 PM IST

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे वादात सापडले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझेंना या प्रकरणी अटक केली आहे. यानंतर आता मुंबई पोलीस खात्यामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीमधील काही नेत्यांची यासंदर्भात बैठक होत असून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'या' दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची लागू शकते वर्णी -

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस खात्याचे सह आयुक्त गुन्हे मिलिंद भारंबे , कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांनी भेट घेतली होती. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती त्या गाडीच्या मागे असलेली इनोवा कार ही मुंबई पोलीस आयुक्तालयात सीआययु विभागाकडून वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात विरोधकांकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. अशातच राज्य सरकार या संदर्भात गंभीर पावले उचलणार असल्याचाही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली तर सदानंद दाते व रजनीश सिंग या दोन अधिकाऱ्यांपैकी एकाची मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी लागू शकते.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझेंना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडीत करण्यात आली आहे. सचिन वाझे यांची चौकशी केली जात असून सचिन वाझेंच्या संपर्कात असलेल्या काही इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे.

Last Updated : Mar 16, 2021, 2:02 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details