मुंबई :टाटा कॅपिटल आणि हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया यांच्या संयुक्त सहकार्याने मुंबई पोलीस दलातील महिलांसाठी पहिल्या टप्प्यातील हिरकणी कक्ष बुधवारपासून एन एम जोशी पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस स्टेशन आणि व्हीआयपी प्रोटेक्शन येथे सुरू करण्यात आले. या हिरकणी कक्षाचे उद्घाटन मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला पोलीस अंमलदार आणि कर्मचारी मोठ्या आनंदात होते. त्यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी घेतलेला पुढाकाराचे कौतुक केले.
स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि नूतनीकरण :महिला पोलिस कर्मचार्यांसाठी सर्वसमावेशक अशा हिरकणी कक्षात स्वच्छतागृहे आणि स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि नूतनीकरण हे 'हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया' या संस्थेने केले आहे. या उपक्रमाचा उद्देश 300 हून अधिक महिला कॉन्स्टेबल आणि अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आहे. स्वच्छता आणि पायाभूत सुविधा या पार्श्वभूमीवर लोअर परळ येथील एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशन, आझाद मैदान पोलिस स्टेशन आणि फोर्टमध्ये व्हीआयपी संरक्षण पोलिस स्टेशन इथे हिरकणी पक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याद्वारे करण्यात आले.
Hirkani Kaksh In Police Station: पोलीस आयुक्तांनी मुलींप्रमाणे विचार करून हिरकणी कक्ष सुरू केला; महिला पोलिसांची प्रतिक्रिया
जागतिक महिला दिनानिमित्त, टाटा कॅपिटल, टाटा समूहाची वित्तीय सेवा शाखा, मुंबई पोलीस दलातील महिलांसाठी स्वच्छता सुविधांसाठी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या संस्थेसोबत संयुक्तपणे हिरकणी कक्ष उभारण्यास मदत केली आहे. पोलीस आयुक्तांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे महिला पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हिरकणी कक्ष ही कल्पना : ईटीव्ही भारतशी बोलताना आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांनी सांगितले की, आतापर्यंत असे होते की फक्त काम करा. आमच्या कल्याणाकडे कुणी बघत नव्हते. पण आता पोलीस आयुक्तांनी यामध्ये पुढाकार घेतला. एक कुटुंबाचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून किंवा कुटुंबाचे प्रमुख म्हणून आपल्या मुलींसाठी त्यांनी हा विचार केला. माझ्या अधिकारी, माझ्या महिला अंमलदार या घर सांभाळतात. त्याचबरोबर पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना या समस्यांचे सामना करावा लागतो. त्यांना व्यवस्थित टॉयलेट नाही, रूम गळते आहे अशा वेळेला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कम्फर्टेबल फील केले पाहिजे, म्हणून पोलीस आयुक्त यांच्या डोक्यामध्ये हिरकणी कक्ष ही कल्पना आली. प्राथमिक स्वरूपात एन एम जोशी पोलीस ठाण्यात हे सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्ही महिला आमदार आणि कर्मचारी खूप खुश आहोत, असे पुढे अरुंधती यांनी सांगितले.