महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जावेद अख्तर मानहानी प्रकरण : मुंबईतील न्यायालयाने निर्णय राखून ठेवला - mumbai Court on javed akhtar defamation petition

जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दावा प्रकरणी, मुंबईतील दिंडोशी येथील न्यायालयाने अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयाच्या कार्यवाहीला आव्हान देणार्‍या कंगना रणौतने दाखल केलेल्या सुधारित याचिकेवर आपला निर्णय ठेवला राखून आहे.

mumbai Court reserves order on kangana ranauts petition
जावेद अख्तर मानहानी प्रकरण : मुंबईतील न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

By

Published : Apr 4, 2021, 12:31 AM IST

मुंबई -जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दावा प्रकरणी, मुंबईतील दिंडोशी येथील न्यायालयाने अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयाच्या कार्यवाहीला आव्हान देणार्‍या कंगना रणौतने दाखल केलेल्या सुधारित याचिकेवर आपला निर्णय ठेवला राखून आहे. शनिवारी मुंबईतील दिंडोशी येथील न्यायालयाने आपला निर्णय या प्रकरणात राखून ठेवला आहे. कंगनाच्या विरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने केलेल्या कारवाईला आव्हान देणारी याचिका दिंडोशी कोर्टात दाखल केली होती.

जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवर कंगना रणौतने न्यायालयात धाव घेतली. मागील सुनावणीत कंगना रणौतला मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी कोर्टाने या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. कंगनाला जामीन 15 हजार रुपयांच्या बाँडवर आणि 20 हजार रुपयाची रोकड हमी दिल्यावर मंजूर झाला. जावेद अख्तर मानहानी प्रकरणात अंधेरी कोर्टाच्या दंडाधिका-यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिला जामीन मंजूर केला. जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगना रणौत विरूद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. कंगनाने हे रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

अभिनेत्री कंगना रणौतला लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात हजर न झाल्याने मुंबईच्या कोर्टाने वॉरंट जारी केले. हे वॉरंट जामीनपात्र होते. गीतकार जावेद अख्तरच्या तक्रारीवरून मुंबईच्या कोर्टाने अभिनेत्री कंगना रनौतला समन्स बजावले होते. जावेद अख्तरने अभिनेत्रीविरोधात तक्रार दिल्यानंतर कथित मानहानीची तक्रार केली जाते आणि पुढील तपास आवश्यक आहे, असे मुंबई पोलिसांनी कोर्टाला सांगितले. डिसेंबर २०२० मध्ये अंधेरी मेट्रो पॉलिटन दंडाधिकारी यांनी जुहू पोलिसांना अख्तरने रणौत हिच्याविरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यायालयासमोर दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीचा तपास करण्याचे निर्देश दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details