मुंबई : मुंबईत सोमवारी ७४ नवे रुग्ण नोंदवल्या गेले आहेत( Mumbai Corona Update ). तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६१ हजार ६८८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४१ हजार २२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८९६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५५०९ दिवस इतका आहे.
Mumbai Corona Update: मुंबईत ७४ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद - Active Corona Patients
कोरोना विषाणूची तिसरी लाट (The third wave of corona virus) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट (Decrease in patients) दिसत आहे. सोमवारी त्यात आणखी घट होऊन ७४ नव्या रुग्णांची (74 new patients recorded) तर शून्य मृत्यूची नोंद ( Zero death) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ८९६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
मुंबई कोरोना अपडेट
मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१२ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ७४ रुग्णांपैकी ७२ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ९४४ बेड्स असून त्यापैकी २८ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.