मुंबई : मुंबईत आज सोमवारी १५० नवे रुग्ण नोंदवल्या गेले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६३ हजार ०५८ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १० लाख ४२ हजार १२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १३७० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३९५४ दिवस इतका आहे.
मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१७ टक्के इतका आहे. मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या १५० रुग्णांपैकी १४४ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४८८ बेड्स असून त्यापैकी ४३ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.