मुंबई:मुंबईत गेल्या २४ तासात ९ हजार ९७३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८६७ नवे रुग्ण आढळून आले Mumbai Corona Update आहेत. आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे. ४८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३१ हजार ७०६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ७ हजार ४१९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ६२४ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १३५२ दिवस इतका आहे
रुग्णसंख्येत वाढमुंबईत दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. दरम्यान दोन लाटा आल्या. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्णांची नोंद झाले त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती.