महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corona Update: कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा 200 पार - कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा 200 पार

मुंबईत कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटे (The third wave of corona virus) नंतर रुग्णसंख्येत घट (Decrease in patients) झाली. मात्र 50 पेक्षा कमी असलेली रुग्णसंख्या मधेच वाढत आहे. मंगळवारी २१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून सध्या १४३० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : May 24, 2022, 7:23 PM IST

मुंबई:मुंबईत मंगळवारी २१८ नवे रुग्ण ( Mumbai Corona Update ) तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६३ हजार २७६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४२ हजार २८० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४३०
सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३९१४ दिवस इतका आहे.

मुंबईत गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१७ टक्के इतका आहे. मुंबईत आज नोंद आलेल्या २१८ रुग्णांपैकी २०१ म्हणजेच ९२ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४८८ बेड्स असून त्यापैकी ४८ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत. मुंबईत पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले होते.

हेही वाचा :Local Train Services Halted : लोडशेडिंगमुळे मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, 20 मिनिटे उशिराने धावतायेत गाड्या

ABOUT THE AUTHOR

...view details