महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corona Update : २४७९ रुग्णांची नोंद, १ मृत्यू, २२ व्हेंटिलेटरवर - १ मृत्यू

मुंबईत गेले पाच दिवस २ हजारावर कोरोना रुग्ण (Mumbai Corona Update) नोंदवण्यात आले. गेल्या २४ तासात चाचण्या वाढल्याने २४७९ नव्या रुग्णांची नोंद ( Record of 2479 patients) झाली आहे. १ जणांचा मृत्यू (1 death) झाला आहे. मुंबईत सध्या ६५५ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ६३ रुग्ण ऑक्सिजनवर, १४८ रुग्ण आयसीयूमध्ये तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर ( 22 on ventilator) आहेत .

Corona Update
कोरोना अपडेट

By

Published : Jun 23, 2022, 7:55 PM IST

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात २० हजार ४०८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २४७९ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १२.१४ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. २३६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १ हजार ८६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ६८ हजार ६५९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या १३ हजार ६१४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३९० दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१७२ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या २४७९ रुग्णांपैकी २३७० म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ७६५ बेड्स असून त्यापैकी ६५५ बेडवर रुग्ण आहेत. ६३ रुग्ण ऑक्सिजनवर, १४८ रुग्ण आयसीयूमध्ये तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.


कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८, १४ जूनला १७२४, १५ जूनला २२९३, १६ जूनला २३६६, १७ जूनला २२५५, १८ जूनला २०५४, १९ जूनला २०८७, २० जूनला १३१०, २१ जूनला १७८१, २२ जूनला १७४८, २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली आहे.



मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details