महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corona Update: १५०४ रुग्णांची नोंद, ३ मृत्यू, २४ व्हेंटिलेटरवर

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona patients) पुन्हा वाढ होऊ लागली. गेले काही दिवस २ हजारावर रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्ण संख्येत किंचित घट होत आहे. आज १५०४ रुग्णांची नोंद झाली आहे ( Record of 1504 patients ) . तर ३ जणांचा मृत्यू ( 3 deaths ) झाला आहे. मुंबईत सध्या ६८१ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ५८ रुग्ण ऑक्सिजनवर, १२९ रुग्ण आयसीयूमध्ये तर २4 रुग्ण व्हेंटिलेटरवर ( 24 on ventilator ) उपचार घेत आहेत.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Jun 29, 2022, 7:54 PM IST

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार १२९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५०४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १०.६४ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. १६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ११ हजार २२७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७९ हजार ७७४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या ११ हजार ८४४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४६१ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१४३ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १५०४ रुग्णांपैकी १४४४ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ७७३ बेड्स असून त्यापैकी ६८१ बेडवर रुग्ण आहेत. ५८ रुग्ण ऑक्सिजनवर, १२९ रुग्ण आयसीयूमध्ये तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.


मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण नोंदवले गेले होते. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८, १४ जूनला १७२४, १५ जूनला २२९३, १६ जूनला २३६६, १७ जूनला २२५५, १८ जूनला २०५४, १९ जूनला २०८७, २० जूनला १३१०, २१ जूनला १७८१, २२ जूनला १७४८, २३ जूनला २४७९, २४ जूनला १८९८, २५ जूनला ८४०, २६ जुनला १७००, २७ जुलैला १०६२, २८ जुलैला १२९०, २९ जुलैला १५०४ रुग्णांची नोंद झाली आहे.


हेही वाचा : Kishori Pednekar Threat To Kill : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details