महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णवाढ सुरूच, 5631 नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत आज 31 डिसेंबरला 5631 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. आज 548 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 85 हजार 110 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 49 हजार 707 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 16 हजार 441 सक्रिय रुग्ण आहेत. ( Mumbai Corona Update on 31st December 2021 )

By

Published : Dec 31, 2021, 10:44 PM IST

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट

मुंबई - डिसेंबर मुंबईत महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 108 रुग्ण आढळून आले होते, त्यात वाढ होऊन आज (31 डिसेंबरला) 5631 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज एका मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच धारावीतही रुग्णसंख्या वाढून आज 34 रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसलेले नसल्याने रुग्णालयातील 92 टक्के बेड रिक्त आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचे व आरोग्य विभागाचे टेंशन वाढले आहे. ( Mumbai Corona Update on 31st December 2021 )

5631 नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत आज 31 डिसेंबरला 5631 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. आज 548 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 85 हजार 110 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 49 हजार 707 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 16 हजार 441 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 360 दिवस इतका आहे. मुंबईमधील 128 इमारती आणि 11 झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.20 टक्के इतका आहे.

हेही वाचा -Corona Cases Hike in Maharashtra : राज्यात दिवसभरात ८ हजार ६७ नवे कोरोनाबाधित, तर ओमायक्रॉनचे चार नवे रुग्ण

92.2 टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या 5631 रुग्णांपैकी 4223 रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. 497 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मुंबईत रुग्णालयांमध्ये 30565 बेडस असून त्यापैकी 2371 बेडवर म्हणजेच 7.8 टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर 92.2 टक्के बेड रिक्त आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 17 डिसेंबरला 295, 19 डिसेंबरला 336, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683, 25 डिसेंबर 757, 26 डिसेंबर 922, 27 डिसेंबरला 809, 28 डिसेंबरला 1377, 29 डिसेंबर 2510, 30 डिसेंबर 3671, 31 डिसेंबरला 5631 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

या आठ दिवशी शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबर, 15 डिसेंबर, 18 डिसेंबर, 20 डिसेंबर, 22 डिसेंबर, 25 डिसेंबर, आणि आज 30 डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

धारावीत 34 रुग्णांची नोंद -

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्याने गेल्यावर्षी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट झाली होती. गेल्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान धारावीत दिवसाला 70 हुन अधिक रुग्णांची नोंद झाली होती. 8 एप्रिलला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक 99 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने धारावीत गेले काही महिने 1 ते 5 रुग्ण आढळून येत होते. कित्तेकवेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, आता मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने धारावीतही रुग्ण वाढू लागले आहे. गेल्या 24 तासात धारावीत 34 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी 18 मे ला सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली होती. आज 20 नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील एकूण रुग्णांची संख्या 7273 इतकी झाली आहे. आतापर्यंत 6761 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या 95 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details