मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. बुधवारी (५ जानेवारी) दुसऱ्या लाटेचा रेकॉर्ड तोडत १५,१६६ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून येत होते. काल (९ जानेवारीला) त्यात किंचित घसरण होऊन १९४७४ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात आणखी घट होऊन १३६४८ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ३ हजार ८६२ वर पोहचली आहे. (Mumbai Corona Update on 10th jan 2022 )
१३६४८ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत आज (१० जानेवारीला) १३६४८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २७,२१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ९ लाख २८ हजार २२० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८ लाख ५ हजार ३३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ३ हजार ८६२ वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३७ दिवस इतका आहे. मुंबईमधील १६८ इमारती आणि ३० झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. ३ जानेवारी ते ८जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.८८ टक्के इतका आहे.
७९ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या १३६४८ रुग्णांपैकी ११३२८ म्हणजेच ८३ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ७९८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ओक रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३५,२६६ बेडस असून त्यापैकी ७४०८ बेडवर म्हणजेच २१ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ७९ टक्के बेड रिक्त आहेत.
हेही वाचा -Third Wave of Corona : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची झाली सुरुवात - आरोग्यमंत्री टोपे
अशी वाढली रुग्णसंख्या -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारीला ६३४७, २ जानेवारीला ८०६३, ३ जानेवारीला ८०८२, ४ जानेवारीला १०८६०, ५ जानेवारीला १५,१६६, ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
धारावीत ९७ रुग्ण -
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. धारावीत ३० डिसेंबरला २०, ३१ डिसेंबरला ३४, १ जानेवारीला २४, २ जानेवारीला ६०, ३ जानेवारीला ४१, ४ जानेवारीला ४०, ५ जानेवारीला ८१, ६ जानेवारीला १०७, ७ जानेवारीला १५०, ८ जानेवारीला १४७, ९ जानेवारीला १२३, १० जानेवारीला ९७ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८१४३ रुग्ण असून ६७८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ९४३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी २३६ रुग्णांना लक्षणे असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ७०७ लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आणि संस्थात्मक विलगीकरणात आहेत.