महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत ४६ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, शून्य मृत्यूची नोंद - मुंबईत ४६ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ

मुंबईत आज (दि.२३ मार्च) ४६ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ६६१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार ८०६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २७७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २२ हजार १४५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००३ टक्के इतका आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

By

Published : Mar 23, 2022, 6:53 PM IST

मुंबई- मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली असून ही लाट आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस १००च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. सध्या गेल्या २ वर्षांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. गेले काही दिवस २० ते ३० रुग्ण आढळून येत होते. आज त्यात किंचित वाढ होऊन ४६ नवीन रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज एकही लक्षणे असलेला रुग्ण आढळून आलेला नाही. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २७७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

४६ नव्या रुग्णांची नोंद -मुंबईत आज (दि.२३ मार्च) ४६ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ६६१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार ८०६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २७७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २२ हजार १४५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००३ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ४६ रुग्णांपैकी ४२ म्हणजेच ९१ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार ४०२ बेड्स असून त्यापैकी ३१ बेडवर म्हणजेच ०.१ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.९ टक्के बेड रिक्त आहेत.

असे झाले रुग्ण कमी -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३, १३ मार्चला ४४, १४ मार्चला २७, १५ मार्चला ५०, १६ मार्चला ४४, १७ मार्चला ७३, १८ मार्चला ४८, १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २३ मार्चला ४६ रुग्णांची नोंद झाली आहे.

३९ वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्च, १७ मार्च, १८ मार्च, १९ मार्च, २० मार्च, २१ मार्च, २२ मार्च, २३ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ३९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २१ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Mask Free Mumbai Soon : मुंबईकरांसाठी खुशखबर.. मुंबई लवकरच होणार मास्क मुक्त..

ABOUT THE AUTHOR

...view details