महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corona Update : ४२० रुग्णांची नोंद, शून्य मृत्यू - Active Corona Patients

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना (Mumbai Corona Update ) विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला २ हजारावर रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर चाचण्यांची संख्या कमी केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज ४२० रुग्णांची नोंद झाली (420 patients registered) आहे. आज शून्य मृत्यूची नोंद (zero deaths) झाली आहे. मुंबईत सध्या ३१७ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई कोरोना
Mumbai Corona

By

Published : Jul 12, 2022, 7:39 PM IST

मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासात ७ हजार ९२८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४२० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ५.२९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ६५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १९ हजार ४५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९६ हजार ५०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ३१८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५३४ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०४४ टक्के इतका आहे.



रुग्णसंख्या स्थिर:मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२० रुग्णांची नोंद झाली आहे.



१११ वेळा शून्य मृत्यूची नोंद :मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १११ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा तर जुलै महिन्यात ५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा : Video : गेट ऑफ इंडियावर हायटेकचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details