मुंबई:मुंबईत सध्या ५१६ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ६० रुग्ण ऑक्सिजनवर, १०८ रुग्ण आयसीयूमध्ये तर १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोना रुग्णांचा शोधासाठी चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १७ हजार १३९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२९३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १३.३७ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज एका मृत्यूची नोंद झाली आहे. १७६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत १० लाख ८५ हजार ८८२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५३ हजार ९६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२ हजार ३४१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४३८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१५५ टक्के इतका आहे. मुंबईत आज कोरोनामुळे १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली महिला रुग्ण असून त्या ६० वर्षावरील वयोवृद्ध होती. तीला दीर्घकालीन आजार होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज नोंद झालेल्या २२९३ रुग्णांपैकी २२०९ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८६१ बेड्स असून त्यापैकी ५१६ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ६० रुग्ण ऑक्सिजनवर, १०८ रुग्ण आयसीयूमध्ये तर १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. मुंबईत पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्णांची नोंग झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली.
मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८, १४ जूनला १७२४, १५ जूनला २२९३ रुग्णांची नोंद झाली आहे.मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा : Nawab Malik Phone Tapping : नवाब मलिक यांचा फोन टॅपिंग प्रकरणात जबाब नोंदविणार