मुंबई: मुंबईत आज शुक्रवारी १५५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे (Mumbai Corona Update ) आहेत. आज ११६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६१ हजार ३३२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४० हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८९८
सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५८९५ दिवस इतका आहे.
मुंबईत सध्या एकही इमारतझोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०११ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १५५ रुग्णांपैकी १५२ म्हणजेच ९८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ९५९ बेड्स असून त्यापैकी २६ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५,