मुंबई:मुंबईत रविवारी १५१ नवे रुग्ण नोंदवण्यात आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६१ हजार ६१४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४१ हजार १६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८८५
सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५८५५ दिवस इतका आहे.
मुंबईत सध्या एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०११ टक्के इतका आहे. मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या १५१ रुग्णांपैकी १४६ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ९४४ बेड्स असून त्यापैकी २५ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.