मुंबई - मुंबईत गेल्या अकरा महिन्यात केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र आता पुन्हा रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते मात्र एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897 तर 21 फेब्रुवारीला 921 नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्ण संख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत रुग्णसंख्येत वाढ सुरूच, 921 नवे रुग्ण, चार मृत्यू - MUMBAI CORONA NUMBER RISE
मुंबईत गेल्या अकरा महिन्यात केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र आता पुन्हा रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते मात्र एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मुंबईत रविवारी 921 रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाख 19 हजार 128वर पोहचला आहे. रविवारी चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 442 वर पोहचला आहे. 540 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या दोन लाख 99 हजार 546वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 7276 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी 346 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेल्या 68 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1017 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 31 लाख 33 हजार 429 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.
रुग्णसंख्या वाढली
मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897 तर आज म्हणजेच 21 फेब्रुवारीला 921 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा -राज्यात लॉकडाऊन की संचारबंदी? थोड्याच वेळात मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद